Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४ लाख ६४ हजारांच्या मुद्देमालासह ‘छोटा हत्ती’ जप्त
गुन्हेगारी

अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४ लाख ६४ हजारांच्या मुद्देमालासह ‘छोटा हत्ती’ जप्त

दारू अक्षय मारुती वाकचौरे (रा. परखतपूर) याच्या सांगण्यावरून संगमनेर येथील अकोले नाका जवळील उमेश सूर्यवंशी याच्याकडून खरेदी केल्याचे समोर आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले

अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एका छोटा हत्ती वाहनावर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ६४ हजार ५४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात दोन खराब आरोपींचा समावेश आहे.

स्थानिक पोलीस, राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत सुरू असलेल्या अवैध दारू वाहतुकीवर शुक्रवारी सकाळी अकोले ते धामणगाव पाट रोडवर पाझर तलावाजवळ ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे संगमनेरमधून ही दारू विक्रीसाठी नेली जात होती.

श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अकोले परिसरात अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे, संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाढे आणि राजेंद्र बिरदवडे यांचे पथक अकोले परिसरात पेट्रोलिंग करत होते.

दरम्यान, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे यांना गुप्त माहिती मिळाली की, अकोले ते धामणगाव पाट जाणारे रोडने एका छोटा हत्ती गाडीतून (क्र. एम.एच.१७ सी.व्ही. ४१६२) अवैध दारूची वाहतूक होणार आहे. या माहितीची खात्री पटताच पोलिसांनी कोतूळ दूरक्षेत्रातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गुंजाळ यांना पाचारण केले आणि दोन पंचांसमक्ष धामणगावच्या शिवारात सापळा रचला.

सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित पांढऱ्या रंगाची गाडी येताना दिसली असता पोलिसांनी ती अडवून झडती घेतली. यावेळी गाडीत विशाल पोपट निळे (वय २६, रा. कौठे धांदरफळ, ता. संगमनेर) आणि राजेंद्र बाळासाहेब तांबे (वय ३०, रा. पेमगिरी, ता. संगमनेर) हे दोघे आढळले. गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये २ लाख ५९ हजार ०४० रुपये किमतीच्या देशी दारूच्या एकूण २६८८ बाटल्या मिळून आल्या.

पथकातील पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता ही दारू अक्षय मारुती वाकचौरे (रा. परखतपूर) याच्या सांगण्यावरून संगमनेर येथील अकोले नाका जवळील उमेश सूर्यवंशी याच्याकडून खरेदी केल्याचे समोर आले. कोतूळ परिसरात विक्रीसाठी ही दारू नेण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या कारवाईत पोलिसांनी दारूसाठा, दोन मोबाईल आणि वाहतुकीसाठी वापरलेली मालवाहतूक गाडी असा एकूण ४ लाख ६४ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विशाल निळे, राजेंद्र तांबे, अक्षय वाकचौरे आणि उमेश सूर्यवंशी या चौघांविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अक्षय वाकचौरे आणि उमेश सूर्यवंशी सध्या फरार आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे आणि अकोलेचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब लोढे, संदीप दरदले, राजेंद्र बिरदवडे, अशोक गाढे, अनिल जाधव आणि महेंद्र गुंजाळ यांच्या पथकाने यशस्वी केली आहे. घटनेचा पुढील तपास अकोले पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 712
अवैध दारू कारवाई अवैध दारू वाहतूक श्रीरामपूर अप्पर अधीक्षक पथक सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.