Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीचा विवाहानंतर सासरी छळ; पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल, संगमनेर पोलीस करणार तपास
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीचा विवाहानंतर सासरी छळ; पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल, संगमनेर पोलीस करणार तपास

बालविवाह आणि अत्याचार अशा दोन्ही गंभीर कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्यानंतर सासरी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून अत्याचार करण्यात आला.
याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची मुकींदपूर (नेवासा फाटा) येथील आहे. ती अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्या आई-वडिलांनी आणि एका मध्यस्थाने संगनमत करून तिचा विवाह शिंदोडी (ता. संगमनेर) येथील एका तरुणाशी लावून दिला होता. हा विवाह सन २०२४ मध्ये झाला होता.
लग्नानंतर पीडिता शिंदोडी येथे सासरी राहण्यास गेल्यानंतर १० एप्रिल २०२६ पर्यंत तिच्यावर सातत्याने अन्याय झाला. सासरी राहत असताना पतीने तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केला. तसेच शुल्लक कारणावरून तिला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली.
या छळामध्ये केवळ पतीच नाही तर सासरच्या इतर मंडळींचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या सासूने तिला वारंवार उपाशी ठेवून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. या जाचाला कंटाळून अखेर पीडितेने धाडस करत पोलीस ठाणे गाठले आणि आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेचे आई-वडील, लग्नातील मध्यस्थ, तसेच शिंदोडी येथील सासू, सासरे, दीर आणि पती अशा एकूण सात जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
सदर घटनेतील गुन्हा सुरुवातीला एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता, मात्र घटनास्थळ संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने आता या प्रकरणाचा सखोल तपास घारगाव पोलीस करत आहेत. बालविवाह आणि अत्याचार अशा दोन्ही गंभीर कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,360
अत्याचार बालविवाह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar19/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक राहील. कार्यक्षेत्रात नवीन संधी…

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.