Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीचा बालविवाह; चौघांना उद्यापर्यंत संगमनेर न्यायालयाची पोलीस कोठडी
न्यायालय

अल्पवयीन मुलीचा बालविवाह; चौघांना उद्यापर्यंत संगमनेर न्यायालयाची पोलीस कोठडी

पीडित मुलीची रवानगी सध्या स्नेहालय, अहिल्यानगर येथे करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपी पतीसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयाने उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तिघे अद्याप फरार आहेत.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी केवळ १३ वर्षे ४ महिन्यांची असताना आरोपींनी संगनमत करून तिचा विवाह लावून दिला होता. पीडितेचे वय कमी असल्याचे माहित असतानाही तिच्या संमतीविना हा विवाह पार पडला आणि त्यानंतर तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आले.

या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये अहिल्या नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक ए. आर. कौटे यांनी पथकासह कारवाई करत गोपीनाथ रावसाहेब गायकवाड, पेत्रम बाबुराव साळवे, सुरेखा संतोष शिंदे, जयश्री पेत्रम साळवे या चार आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणखी काही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी आणि फरार आरोपींची माहिती मिळवण्यासाठी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायाधीश मंदार नेरलेकर यांच्या न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत (१७ एप्रिल) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बालविवाह लावणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. पीडित मुलीची रवानगी सध्या स्नेहालय, अहिल्यानगर येथे करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,387
पोलीस कोठडी बालविवाह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.