Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या भोंदू गडगेबाबाच्या ‘काळ्या साम्राज्या’चे धिंडवडे; जिल्ह्याभरात १३ मालमत्तांचे घबाड, पोलिसांच्या हाती लागले २०० व्हिडिओंचे पुरावे!
गुन्हेगारी

संगमनेरच्या भोंदू गडगेबाबाच्या ‘काळ्या साम्राज्या’चे धिंडवडे; जिल्ह्याभरात १३ मालमत्तांचे घबाड, पोलिसांच्या हाती लागले २०० व्हिडिओंचे पुरावे!

भोंदू बाबाच्या या साम्राज्याचा विस्तार करण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/04/2026Updated:24/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

गोरगरीब जनतेच्या अज्ञानाचा आणि आजारपणाचा फायदा घेऊन स्वतःच्या तिजोऱ्या भरणाऱ्या वडगाव पान येथील भोंदू गडगेबाबाच्या काळ्या साम्राज्याचा पोलिसांनी अक्षरशः चक्काचूर केला आहे. स्वतःला देवमाणूस म्हणवून घेणाऱ्या या भोंदूने संगमनेरसह अहिल्यानगर, नेवासा आणि राहता अशा मोक्याच्या ठिकाणी तब्बल १३ मालमत्तांचे जाळे विणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या मालमत्ता स्वतःसह पत्नी, मुलगा आणि मुलीच्या नावावर चढवून या महाभागाने माया जमवली असून, पोलिसांनी आता या सर्व कागदपत्रांची जंत्रीच हाती घेतली आहे.
​श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करताना बाबाच्या पापाचा घडा कसा भरला, याची सविस्तर माहिती दिली. बाबाच्या आश्रमावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी २०० व्हिडिओ जप्त केले असून, त्यामध्ये भोंदूपणाचे आणि उपचारांच्या नावाखाली चालणाऱ्या ढोंगाचे जिवंत पुरावे दडलेले आहेत. हे व्हिडिओ आता फॉरेन्सिक ऑडिटसाठी पाठवण्यात आले असून, न्यायालयात याच पुराव्यांच्या आधारे भोंदू बाबाची नाकेबंदी केली जाणार आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे रुग्ण खरेच रुग्ण होते की बाबाने आपला प्रभाव पाडण्यासाठी पाळलेले ‘भाडोत्री हस्तक’ होते, याचाही निकाल लवकरच लागणार आहे.
​या संपूर्ण प्रकरणाचा खरा सूत्रधार असलेला डॉ. मोहन पुरी हा सध्या फरार असून, तोच या भोंदूगिरीचा मुख्य मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. डॉ. पुरी हा बाबाला औषधांचा रसद पुरवत होता. विशेष म्हणजे, या तथाकथित डॉक्टरचा इतिहासही गुन्हेगारीने माखलेला असून नाशिक जिल्ह्यात त्याच्यावर आधीच चार गुन्हे दाखल आहेत. संगमनेरच्या आयुर्वेद महाविद्यालयातून जेमतेम पदवी पदरात पाडून घेणाऱ्या या डॉक्टरला चार वर्षांच्या अभ्यासासाठी सात वर्षे खर्ची घालावी लागली होती. सिन्नर येथे औषध निर्मितीचा कारखाना चालवणारा हा डॉक्टर केवळ या एकाच बाबाला नव्हे, तर राज्यात आणखी किती भोंदूंना रसद पुरवत होता, याचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
​सोशल मीडियाचा वापर करून या भोंदूने आपले जाळे पसरवले होते. चक्क एका ‘सोशल मीडिया टीम’ची नेमणूक करून रुग्णांचे खोटे व्हिडिओ फेसबुक आणि यूट्यूबवर प्रसारित केले जात होते. हजारो सर्वसामान्य नागरिक या भूलथापांना बळी पडले. मात्र, ज्या कॅमेऱ्याच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली, त्याच कॅमेऱ्यातील फुटेज आता या बाबाला कोठडीची हवा खाऊ घालणार आहे. बाबाच्या विविध बँकांमधील १० खात्यांची आणि सात ट्रस्टींच्या व्यवहारांची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. या गुन्ह्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यापैकी बाबा आणि त्याच्या एका साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. फरार डॉ. पुरी आणि त्याच्या इतर साथीदारांना जेरबंद केल्यानंतर या गोरखधंद्यातील आणखी काही ‘मोठे मासे’ गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,742
पत्रकार परिषद भोंदू गडगे महाराज मालमत्ता सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.