Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वैद्यकीय क्षेत्राला लागलेली भोंदूगिरीची कीड; संगमनेरातील डॉक्टरांच्या संघटनेची दुटप्पी भूमिका चव्हाट्यावर, भोंदूगिरीवर बाळगले मौन
गुन्हेगारी

वैद्यकीय क्षेत्राला लागलेली भोंदूगिरीची कीड; संगमनेरातील डॉक्टरांच्या संघटनेची दुटप्पी भूमिका चव्हाट्यावर, भोंदूगिरीवर बाळगले मौन

समाजात अंधश्रद्धा पसरवून वैद्यकीय विज्ञानालाच आव्हान देणाऱ्या या भोंदूगिरीविरोधात ब्र काढण्याची तसदीही या संघटनेने घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/04/2026Updated:25/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

गोरगरीब जनतेच्या अज्ञानाचा बाजार मांडणाऱ्या आणि स्वतःला ‘देवमाणूस’ म्हणवून घेणाऱ्या वडगाव पान येथील भोंदू गडगेबाबाच्या पापाचा घडा अखेर भरला आहे. पोलिसांनी या भोंदूच्या काळ्या साम्राज्याचा चक्काचूर केला असला, तरी या संपूर्ण प्रकरणात संगमनेरातील उच्चभ्रू डॉक्टरांच्या संघटनेने धारण केलेले मौन आता टीकेचे धनी ठरत आहे.

समाजात अंधश्रद्धा पसरवून वैद्यकीय विज्ञानालाच आव्हान देणाऱ्या या भोंदूगिरीविरोधात ब्र काढण्याची तसदीही या संघटनेने घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या रॅकेटचा पर्दाफाश केला, मात्र ज्यांच्या डोळ्यादेखत हे दुकान सुरू होते, ते सुशिक्षित डॉक्टर हा प्रकार माहिती असून देखील नेमके कुणाच्या दबावाखाली गप्प होते, असा जळजळीत सवाल आता विचारला जात आहे.

पोलीस कोठडीत असलेल्या गडगे बाबाच्या या भोंदूगिरीचा खरा सूत्रधार असलेला त्याचा सहकारी डॉ. मोहन पुरी हा सध्या फरार असून त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीचा आलेखही आता समोर आला आहे. वैद्यकीय पदवी मिळवण्यासाठी त्याने सात वर्षे खर्ची घातली, अशा या कथित डॉक्टरने सिन्नरमध्ये औषध निर्मितीचा कारखाना थाटून या भोंदू बाबाला रसद पुरवली. संगमनेरच्या डेरे आयुर्वेद महाविद्यालयाचा हा ‘नमुना’ राज्यातील आणखी किती भोंदूंना औषधे पुरवत होता, याचे मोठे रॅकेट पोलीस तपासात उघड होण्याची दाट शक्यता आहे.

मात्र, इतके गंभीर प्रकार उजेडात येऊनही संगमनेरच्या डॉक्टरांच्या संघटनेने साधी निषेधाची ओळही प्रसिद्ध केली नाही. स्वतःच्याच व्यवसायाची प्रतिष्ठा धुळीला मिळवणाऱ्या अशा कृत्यांकडे कानाडोळा करणे हा जनतेच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.

दुसरीकडे, डॉक्टरांच्या याच संघटनेचा दुटप्पीपणा आता चव्हाट्यावर आला आहे. जिथे भोंदूगिरीवर मौन पाळले जाते, तिथेच उपचारातील हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याच्या प्रकरणात मात्र डॉक्टरांची एक संघटना आक्रमक होताना दिसत आहे. नामांकित रुग्णालयातील दोघा डॉक्टरांवर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाल्यानंतर, संघटनेने चक्क कायद्यालाच आव्हान देण्याचे धाडस दाखवले आहे. पीडित महिलेला आपल्या पतीच्या मृत्यूला न्याय मिळवण्यासाठी न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागले, परंतु या संघटनेला मात्र कायद्याच्या कारवाईपेक्षा आरोपी डॉक्टरांची ढाल बनण्यातच जास्त रस असल्याचे दिसते.

पोलिस आणि न्यायालयाच्या प्रक्रियेवर भाष्य करण्याऐवजी ही संघटना प्रसारमाध्यमांवर ‘मीडिया ट्रायल’चे आरोप करून दबावतंत्राचा वापर करत आहे. सोशल मीडियावरून व्हिडिओ व्हायरल करणे आणि प्रशासनाला निवेदने देऊन आरोपींना वाचवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. एकीकडे भोंदू बाबाच्या साम्राज्याकडे बघ्याची भूमिका घ्यायची आणि दुसरीकडे कायद्याने गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांच्या पाठीशी उभे राहायचे, ही दुटप्पी नीती संतापाला निमंत्रण देणारी ठरली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 890
भोंदूगिरी मौन संघटना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar19/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक राहील. कार्यक्षेत्रात नवीन संधी…

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.