Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार संजय गायकवाड आणि बागेश्वर बाबांच्या विधानांवर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी; माकपची आक्रमक मागणी
महाराष्ट्र संवाद विशेष

आमदार संजय गायकवाड आणि बागेश्वर बाबांच्या विधानांवर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी; माकपची आक्रमक मागणी

एकीकडे नारी शक्तीचा सन्मान करण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे अशा प्रवृत्तींना पाठीशी घालायचे, हा दुटप्पीपणा सरकारने सोडावा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, विशेष प्रतिनिधी –

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावरून केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि कथावाचक बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वादग्रस्त विधान यावरून राजकारण तापले आहे. या दोन्ही प्रकरणांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) केली आहे.

‘शिवाजी कोण होता?’ या प्रसिद्ध पुस्तकाचे संपादक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ व धमक्या दिल्याचा आरोप माकपने केला आहे. गायकवाड यांनी वापरलेली भाषा सभ्य समाजाला न शोभणारी असून, महिलांचा अवमान करणारी आहे. एकीकडे नारी शक्तीचा सन्मान करण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे अशा प्रवृत्तींना पाठीशी घालायचे, हा दुटप्पीपणा सरकारने सोडावा अशी टीका पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केली आहे. संजय गायकवाड हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने त्यांच्या या वागण्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन न बाळगता आपले मत स्पष्ट करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानाचाही माकपने तीव्र निषेध केला आहे. महाराजांनी आपली राजसत्ता समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केली होती, असे विधान करून बागेश्वर बाबांनी इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

अशा चुकीच्या विधानांचे मुख्यमंत्री समर्थन करत आहेत का, असा सवाल उपस्थित करत या दोन्ही व्यक्तींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी डॉ. अजित नवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 408
अजित नवले देवेंद्र फडणवीस निषेध बागेश्वर बाबा संजय गायकवाड
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar19/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक राहील. कार्यक्षेत्रात नवीन संधी…

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.