Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणाच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये कॅन्डल मार्च; आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
आंदोलन

पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणाच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये कॅन्डल मार्च; आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

कॅन्डल मार्च प्रांत अधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर येथे उपस्थित लहान मुलींच्या हस्ते प्रांताधिकारी अरुण उंडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन| संगमनेर:

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या घटनेचे तीव्र पडसाद संगमनेरमध्ये उमटले आहेत. या क्रूर घटनेच्या निषेधार्थ आणि अत्याचारीत सर्वच बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने भव्य ‘कॅन्डल मार्च’ काढण्यात आला.

संगमनेर बसस्थानक परिसरातून निघालेल्या या मोर्चात महिला आणि तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. कॅन्डल मार्च प्रांत अधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर येथे उपस्थित लहान मुलींच्या हस्ते प्रांताधिकारी अरुण उंडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या घटनेचा निषेध करत नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी लावून धरली.

तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी या नराधमाला तात्काळ मृत्युदंडाची शिक्षा झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात आज महिला असुरक्षित आहेत, ही अत्यंत शरमेची बाब आहे. विकसित भारताच्या घोषणा दिल्या जात असताना प्रत्यक्षात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्या चिमुकल्या मुलीचा काय दोष होता? अशा गुन्हेगारांना कोणताही जात-धर्म नसतो, त्यामुळे त्यांना चौरंगासारखी किंवा फाशीची कठोर शिक्षा देऊन समाजात दहशत निर्माण करणे गरजेचे आहे.

देशात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ठोस पावले उचलणे आवश्यक असून केवळ घोषणाबाजी न करता कडक कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. यावेळी त्यांनी वडगाव पान येथील ऍसिड हल्ला प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट असल्याबद्दल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी हळहळ व्यक्त करत महिला आणि लहान मुलींना शाळेत जाणेही आता असुरक्षित वाटू लागले आहे, ही दुर्दैवी परिस्थिती ओढवली आहे. या नराधमांना मृत्युदंडापेक्षाही कठोर शिक्षा मिळावी, जेणेकरून भविष्यात असे पाशवी कृत्य करण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही.

नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, एक माता आणि एक स्त्री म्हणून आज मुलींच्या सुरक्षेची चिंता वाटत आहे. सरकारने वेळ न घालवता शक्ती कायद्यासारख्या कठोर कायद्यांची अंमलबजावणी करावी.

या ऐतिहासिक निषेध मोर्चात दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ. मैथिलीताई तांबे यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, शेखर सोसे, नगरसेवक किशोर टोकसे, विशाल ढोले, सिद्धेश घाडगे, मनीषा राहणे, प्रियंका जगनर, वनिता गाडे, प्रकाश कडलग, प्राची कवडे, अर्चना दिघे, प्राजक्ता कुलकर्णी, तनिष्का कुलकर्णी, समीर कुलकर्णी, ललित शिंदे, शर्मिला हांडे, सुभाष दिघे, प्रीतम साबळे, प्राजक्ता घुले, वृषाली साबळे, डॉ. अनुराधा सातपुते, सौ. सरोज पगडाल, सौ. नंदा गरुडकर, यशवंती नरवडे, श्रीकांत साबळे, शरद पावबाके, सोमनाथ गोडसे, ऋत्विक राऊत, शुभम शिंदे, मयूर घुले, अलोक बर्डे, सुरभी मोरे, वैशाली कडबाने, अमृता राऊत आणि तात्याराम कुटे यांच्यासह संगमनेर तालुक्यातील शेकडो नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 357
कॅन्डल मार्च जयश्री थोरात दुर्गाताई तांबे मैथिली तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  विशेष प्रतिनिधी / मुंबई: मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाची शिस्त आणि…

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.