Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » फसवणूक प्रकरणी अहिल्यानगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भोंदू अशोक खरातला राहता न्यायालयाने दिली पोलीस कोठडी
गुन्हेगारी

फसवणूक प्रकरणी अहिल्यानगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भोंदू अशोक खरातला राहता न्यायालयाने दिली पोलीस कोठडी

यावेळी पोलिसांनी आठ दिवसाच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दिलेल्या या वाढीव कोठडीमुळे आता या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | शिर्डी:

राज्यभरात आपल्या भोंदूपणाने आणि आर्थिक गैरव्यवहाराने खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात याला शिर्डी पोलिसांनी फसवणूक प्रकरणी नाशिकमधून अटक केल्यानंतर आता न्यायालयीन प्रक्रियेत मोठा निर्णय झाला आहे. राहता न्यायालयाने आरोपी अशोक खरात याला ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आतापर्यंत एसआयटीच्या ताब्यात असलेल्या आणि नऊ गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या एसआयटी कडून खरातचा ताबा शिर्डी पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला मंगळवारी राहता न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी आठ दिवसाच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दिलेल्या या वाढीव कोठडीमुळे आता या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अशोक खरात आणि त्याच्या पत्नीवर शिर्डी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने भोंदूपणा करून लोकांची दिशाभूल करणे, मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक, जमिनींचे बेकायदेशीर व्यवहार आणि अनधिकृत सावकारी अशा आरोपांचा समावेश आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून रावसाहेब गोंदकर नावाच्या शेतकऱ्याला विविध प्रलोभने दाखवून या दाम्पत्याने मोठा आर्थिक गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या आरोपींची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध होती. सुरुवातीला भोंदूपणाच्या जोरावर लोकांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर संधी मिळताच त्यांच्या मालमत्तेवर डल्ला मारायचा, असा त्यांचा शिरस्ता होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खरात याला ताब्यात घेतल्यानंतर राहता ग्रामीण रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला पोलीस कोठडीत ठेवून रात्रभर कसून चौकशी करण्यात आली.

सध्या पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी तपासात या दाम्पत्याने आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे आणि या संपूर्ण गैरव्यवहारातील आर्थिक आकडा नेमका किती कोटींच्या घरात आहे, याचे सत्य बाहेर येईल. ९ मे पर्यंत मिळालेल्या या कोठडीत पोलिसांच्या हाती आणखी काही महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 498
पोलीस कोठडी फसवणूक भोंदू बाबा अशोक खरात शिर्डी पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar19/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक राहील. कार्यक्षेत्रात नवीन संधी…

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.