Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वैद्यकीय क्षेत्राला काळीमा! नामवंत डॉक्टर कुटेही पोलिसांच्या जाळ्यात, छाप्यात १० हजारांत गर्भलिंग निदान करणारे पकडले होते ‘यमाचे दूत’!
गुन्हेगारी

वैद्यकीय क्षेत्राला काळीमा! नामवंत डॉक्टर कुटेही पोलिसांच्या जाळ्यात, छाप्यात १० हजारांत गर्भलिंग निदान करणारे पकडले होते ‘यमाचे दूत’!

लिंगनिदान चाचणी करणारे डॉक्टर, एजंट, दलाल यांचेवर त्याचप्रमाणे संबंधित महिलेच्या कुटुंबीयांवर एवढ्या मोठ्या संख्येने अटक करून केलेली ही पहिलीच कारवाई असण्याची शक्यता आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/05/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर

लोणी परिसरातील पिंपरी निर्मळ शिवारात सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश करताना एका डॉक्टर्स एजंटला रंगेहाथ पकडले होते. चौकशीअंती यात श्रीरामपूर मधील नामांकित डॉक्टरचा समावेश असल्याचे समोर आल्याने या डॉक्टरलाही बेड्या ठोकण्यात आल्या असून, राहता न्यायालयाने या नराधमांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यात आणखी काही डॉक्टर एजंट सामील असल्याची शक्यता असून पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहे.

एकिकडे शासन स्तरावर ‘बेटी बचाओ’चे नारे दिले जात असताना, दुसरीकडे समाजातील काही पांढरपेशी डॉक्टर कोवळ्या कळ्यांचा गर्भातच गळा घोटण्याचे पाप करत असल्याचे भयंकर वास्तव समोर आले आहे. पिंपरी निर्मळ येथील छाप्यादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये यापूर्वी डॉ. राहुल आबासाहेब भनगे (वय ३४, रा. भानसहिवरे, नेवासा) आणि अभिजित दिलीप भुसाळ (वय ३०, रा. पिंपरी निर्मळ) यांना पकडण्यात आले होते.

तपासा दरम्यान यामध्ये एजंट प्रदीप भाऊसाहेब ढगे व निलेश ज्ञानेश्वर भवर यांच्यासह श्रीरामपूर मधील नामांकित डॉ. रवींद्र कुटे यांचा समावेश असल्याचे समोर आले. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे. या प्रकाराने वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. समाजातील उच्चभ्रू पांढरपेशी आणि देवदूत समजले जाणारे डॉक्टर आता कसाही बनले असून गर्भातच अल्पवयीन कळ्यांचा नाश करू लागल्याचे बोलले जात आहे.

पिंपरी निर्मळ शिवारातील निळवंडे कॅनॉलच्या कडेला असलेल्या एका बंदिस्त खोलीत १० हजार रुपये घेऊन गुपचूप गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोग्य विभाग आणि महसूल विभागाच्या मदतीने या ठिकाणी चक्रव्यूह रचला. पोलिसांनी साध्या वेशात या ठिकाणी छापा टाकला असता, तिथे जे दृश्य दिसले ते पाहून पोलीसही चक्रावून गेले. वैद्यकीय व्यवसायाला काळीमा फासण्याचे काम तिथे सुरू होते.

या कारवाईत पोलिसांनी डॉ. राहुल आबासाहेब भनगे (वय ३४, रा. भानसहिवरे, नेवासा) आणि अभिजित दिलीप भुसाळ (वय ३०, रा. पिंपरी निर्मळ) यांना रंगेहात पकडले. या गुन्हेगारांकडून साडेचार लाख किमतीचे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, लॅपटॉप, मोबाईल, रोख रक्कम आणि स्विफ्ट, ईर्टिगा व वॅगनआर अशा तीन आलिशान गाड्यांसह एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मात्र, तपास इथेच थांबला नाही. पोलिसांनी नव्याने पकडलेल्या एजंट प्रदीप भाऊसाहेब ढगे (रा. कोन्हाळे) याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडे लपवून ठेवलेले लिंग निदानाचे दुसरे मशीन मिळून आले. यासोबतच निलेश ज्ञानेश्वर भवर यालाही अटक करण्यात आली आहे. यातून नामांकित डॉक्टर कुटे यांचे नाव समोर आल्याने पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत डॉ. कुटे यांनाही बेड्या ठोकल्या आहेत. एका नामांकित डॉक्टरचा अशा गुन्ह्यात समावेश असल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे, हे यावरून स्पष्ट होते.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ठरलेल्या या कारवाईमध्ये जिल्ह्यात प्रथमच इतक्या दोन डॉक्टर, एजंट आणि दलाल आणि महिलांच्या कुटुंबीयांना आरोपी करत अटक करण्यात आली आहे. या रॅकेटचे धागेदोरे केवळ नगर जिल्ह्यापुरते मर्यादित नसून त्याचे कनेक्शन बाहेरच्या जिल्ह्यात पसरले असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केवळ पैशाच्या हव्यासापोटी स्त्री भ्रूणहत्येला प्रोत्साहन देणाऱ्या या साखळीचा श्रीरामपूर चे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कणा मोडला आहे.

बुधवारी या तिन्ही आरोपींना राहता न्यायालयात हजर करण्यात आले असता, सरकारी पक्षाने केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात हे रॅकेट नेमके कोणाकोणाच्या आशीर्वादाने चालत होते आणि यामध्ये आणखी किती डॉक्टर किंवा हॉस्पिटल्स सामील आहेत, याचा बारकाईने तपास लोणी पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अन्यही काही डॉक्टर, एजंट सामील असण्याची शक्यता आहे. त्याबाबताही बारकाईने तपास करने सुरु आहे. यातील एजंट नामे प्रदीप ढगे याच्याकडे लिंग निदान चाचणी करणारे आणखी एक मशीन मिळून आले असून ते देखील जप्त करण्यात आले आहेत. लिंगनिदान चाचणी करणारे डॉक्टर, एजंट, दलाल यांचेवर त्याचप्रमाणे संबंधित महिलेच्या कुटुंबीयांवर एवढ्या मोठ्या संख्येने अटक करून केलेली ही पहिलीच कारवाई असण्याची शक्यता आहे. – सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,571
अवैध गर्भलिंग निदान छापा पोलीस कारवाई प्रतिष्ठित डॉक्टर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
श्रद्धांजली

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

By Annant Ppangarkar20/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर येथील जेष्ठ पत्रकार विनोद बूब (वय ७८) यांचे रविवारी…

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.