Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जन्म दाखल्यासाठी ३ हजारांची लाच घेताना नगरपरिषदेचे दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
गुन्हेगारी

जन्म दाखल्यासाठी ३ हजारांची लाच घेताना नगरपरिषदेचे दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपाधिक्षक अजित त्रिपुटे करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, जामखेड:

नगरपरिषदेमध्ये आपल्या मुला-मुलीचा जन्मदाखला मिळवण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

या कारवाईमुळे जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील लिपिक अभिजित जालीम भैसडे आणि कंत्राटी मदतनीस अहमद इलियास शेख अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

या प्रकरणातील तक्रारदाराने नोव्हेंबर २०२५ मध्ये आपल्या मुलांच्या जन्मदाखल्यासाठी नगरपालिकेकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केला होता. हे दाखले देण्यासाठी लिपिक भैसडे याने दीड हजार रुपये प्रति दाखला याप्रमाणे तीन हजार रुपयांची मागणी केली होती. लाचेची ही रक्कम अग्निशमन दलातील कंत्राटी मदतनीस अहमद शेख याच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते.

याबाबत तक्रारदाराने ५ मे रोजी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर ६ मे रोजी विभागाने सापळा रचला आणि अहमद शेख याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या गुन्ह्यात लाचेला प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवून लिपिक भैसडे यालाही एसीबीने ताब्यात घेतले आहे.

या कारवाईनंतर आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नगरपरिषदेतील या भ्रष्ट कारभाराचा आज पंचनामा झाला असल्याचे सांगतानाच, कारवाई झालेले कर्मचारी हे केवळ छोटे मासे आहेत, अशी टीका त्यांनी केली. प्रशासनातील भ्रष्टाचाराचा मुख्य सूत्रधार असलेला ‘मोठा मासा’ अद्याप बाहेरच असून, त्याला वाचवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोपही पवार यांनी केला. या मोठ्या माशाला जाळ्यात ओढून बाहेर काढण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधिक्षक अजित त्रिपुटे यांच्या पथकाने यशस्वी केली. या पथकात पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ आणि दशरथ लाड यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपाधिक्षक अजित त्रिपुटे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 469
लाचखोरी लाचलुचपत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
श्रद्धांजली

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

By Annant Ppangarkar20/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर येथील जेष्ठ पत्रकार विनोद बूब (वय ७८) यांचे रविवारी…

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.