Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्रा’वर छापा; बोगस डॉक्टर तन्वीर देशमुखविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हेगारी

‘गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्रा’वर छापा; बोगस डॉक्टर तन्वीर देशमुखविरुद्ध गुन्हा दाखल

११ मे रोजी दिवाणी न्यायालयाने याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. तसेच या संदर्भात गणेश बोऱ्हाडे यांनी देखील आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर १२ मे रोजी सकाळी आरोग्य विभाग आणि नगरपालिकेच्या पथकाने नगर-मनमाड हायवेवरील रोशन कॉम्प्लेक्स शेजारी असलेल्या क्लिनिकवर छापा टाकून पंचनामा केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

‘गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्रा’वर छापा; बोगस डॉक्टर तन्वीर देशमुखविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, राहुरी:

बनावट पदव्यांच्या आधारे अधिकृत नोंदणी नसताना रुग्णसेवा देऊन लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या राहुरीतील एका बोगस डॉक्टरवर मंगळवारी पोलिसांनी कारवाई केली. राहुरी येथील ‘गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्रा’वर प्रशासनाने छापा टाकून तन्वीर हारुन देशमुख याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामीण रुग्णालय राहुरीचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश बाबासाहेब मिसाळ यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनकडून प्राप्त झालेल्या गोपनीय आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये आरोग्य विभागाने देशमुख याच्या क्लिनिकची पाहणी केली असता, तिथे इलेक्ट्रोपॅथी उपचार पद्धती आणि आयुर्वेदिक औषधे आढळली होती. यावेळी त्याने सादर केलेली बीएएमएस (नॅचरोपॅथी) आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे पडताळणीसाठी संबंधित बोर्डांकडे पाठवण्यात आली होती.

तपासणीदरम्यान आयुष मंत्रालय (भारत सरकार) आणि आयुष संचालनालय (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून मिळालेल्या अहवालात, देशमुख याने सादर केलेली प्रमाणपत्रे देणारी ‘इंडियन मेडिकल बोर्ड – नॅचरोपॅथी सिस्टिम, कानपूर’ ही संस्था नोंदणीकृत नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच उत्तर प्रदेशच्या आयुर्वेदिक तथा युनानी तिब्बी चिकित्सा पद्धती बोर्डानेही तन्वीर देशमुख त्यांच्याकडे नोंदणीकृत नसल्याचे कळवले. महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, देशमुख केवळ ॲक्युपंक्चरचा व्यवसाय करण्यास पात्र असतानाही तो बेकायदेशीरपणे ‘डॉक्टर’ शब्दाचा वापर करून रुग्णांवर उपचार करत असल्याचे निष्पन्न झाले.

११ मे रोजी दिवाणी न्यायालयाने याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. तसेच या संदर्भात बोगस वैद्यकीय शोध समितीचे सदस्य गणेश बोऱ्हाडे यांनी देखील आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर १२ मे रोजी सकाळी आरोग्य विभाग आणि नगरपालिकेच्या पथकाने नगर-मनमाड हायवेवरील रोशन कॉम्प्लेक्स शेजारी असलेल्या क्लिनिकवर छापा टाकून पंचनामा केला. या कारवाईत कोणतीही अधिकृत नोंदणी नसताना आणि बोगस पदव्यांचा वापर करून रुग्णांच्या हिताला बाधा पोहोचवल्याबद्दल तन्वीर देशमुखविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व वैद्यकीय व्यवसाय अधिनियमांतर्गत विविध कलमा नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 769
कारवाई गणेश बोऱ्हाडे बोगस डॉक्टर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

संगमनेरमध्ये डीजे नियमांचे उल्लंघन; ६ जणांवर गुन्हा दाखल

25/09/2026

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

रविवार विशेष लेख— साहिलचा मृत्यू; शिक्षणाच्या मंदिरातील प्रश्न आता टाळता येणार नाहीत!

27/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.