Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काटकसरीच्या इव्हेन्टने मंत्री, मुख्यमंत्र्यांचं हसं! व्हिडीओबाजीवर नेटकऱ्यांची जोरदार टीका
राजकारण

काटकसरीच्या इव्हेन्टने मंत्री, मुख्यमंत्र्यांचं हसं! व्हिडीओबाजीवर नेटकऱ्यांची जोरदार टीका

मुख्यमंत्र्यांच्या या बुलेट प्रवासाची माहिती माध्यमांच्या प्रतिनिधींना पोचवण्यात आल्याने मोठ्या संख्येने फोटोग्राफर आणि वाहिन्यांचे कॅमेरे विधानभवनात जमा झाले होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/05/2026Updated:14/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून इतर मंत्र्यांनीही बचतीची नाटकं सुरु केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षावरून विधानभवनात बुलेटवरून पोहोचले तर उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी शिंदे बॅटरी कारने मंत्रालय गाठलं. आणखी एक मंत्री नितेश राणे मंत्रालयासमोरील बंगल्यातून चालत मंत्रालयात पोहोचले. मात्र या मंत्र्यांच्या इव्हेन्टबाजीची नेटकऱ्यांनी चांगलीच खेचली. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना चांगलाच आरसा दाखवला.

इराण-अमेरिका युद्धाच्या पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचं आवाहन केलं होतं. मोदींच्या या आवाहनानंतर महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांमध्ये काटकसरीची एकच स्पर्धा लागली होती. स्वतः मुख्यमंत्री त्यात सहभागी झाल्याने तो एकच चर्चेचा विषय बनला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी वर्षा निवासस्थानातून बुलेटवर प्रवास करून थेट विधान भवन गाठलं. विधानभवनात नव्या आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या या बुलेट प्रवासाची चर्चा सुरू असताना तो एक इव्हेंटच बनला होता. मुख्यमंत्र्यांच्या या बुलेट प्रवासाची माहिती माध्यमांच्या प्रतिनिधींना पोचवण्यात आल्याने मोठ्या संख्येने फोटोग्राफर आणि वाहिन्यांचे कॅमेरे विधानभवनात जमा झाले होते.

मुख्यमंत्र्यांच्या या इव्हेंटबाजीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही आपलं वाहन सोडून बॅटरी वाहनाने मंत्रालयात पोहोचले. त्यांच्याही फोटो आणि शूटिंग वाहिन्यांचे प्रतिनिधी करत असल्याचे पाहायला मिळाले. राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे हे तर मंत्रालयाच्या समोरच राहतात. पण त्यांनीही इव्हेंटबाजी करून अगदी पाच मिनिटांचा अंतर चालत जात असल्याची शोबाजी केली. काल केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंत्रालयाजवळून मेट्रो प्रवास केला. तेव्हाही पत्रकार उपस्थित होते.

मंत्र्यांच्या या शोबाजीची नेटकऱ्यांकडून चांगलीच टर खेचली जात होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बुलेटची पीयूसी संपल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलं. तर दुसऱ्याने बुलेट ऐवजी बजाज कावासकी वापरली असती तर बुलेट इतकं इंधन लागलं नसतं असं म्हटलं. आणखी एकाने बुलेट पाण्यावर कधीपासून चालायला लागली असा सवाल केला. शिंदेंच्या शोबाजीची टिंगल करताना कोटींची उड्डाणं संपली काय असं विचारलं. नितेश राणे यांच्यावरही समाज माध्यमातून खरपूस टीका करण्यात आली.

तिकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या चार्टर्ड विमान प्रवासाचीही चर्चा सुरु होती. एका मंत्र्याने आपल्या ताफ्यातील 17 पैकी 9 गाड्या कमी केल्याची मखलाशी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा धागा पकडून मंत्र्यांना 17 गाड्यांचा ताफा दिला कोणी अशी विचारणा करत मंत्र्यांना उघड पाडलं.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 558
उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.