Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर संधी नाकारणे अन्यायकारक; माकपचा राज्य सरकारवर घणाघात
राजकारण

राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर संधी नाकारणे अन्यायकारक; माकपचा राज्य सरकारवर घणाघात

केवळ राजकीय गणिते डोळ्यासमोर ठेवून घेतलेल्या या निर्णयामुळे गुणवत्ताधारक मागासवर्गीय उमेदवारांचे नुकसान होणार असून, सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असा इशाराही डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, मुंबई:

राज्य मंत्रिमंडळाने राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या प्रवर्गातील जागांवर प्रवेशासाठी बंदी घालण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो अत्यंत अन्यायकारक असून आरक्षणाच्या मूळ संकल्पनेलाच हरताळ फासणारा असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) केली आहे.

राज्याचे आरक्षण ७२ टक्क्यांवर पोहोचल्याने खुल्या प्रवर्गातील स्पर्धा कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा सरकार करत असले तरी, हा युक्तीवाद घटनाबाह्य असल्याचे पक्षाने म्हटले आहे. आरक्षणाचे तत्व हे केवळ ‘समान संधी’ देण्यासाठी नसून सामाजिकदृष्ट्या पिछाडीवर राहिलेल्या घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहे. सकारात्मक भेदभावाच्या सिद्धांतानुसार आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे, मात्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे आरक्षणाचा हा मूळ उद्देशच धोक्यात आला असल्याचे माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. सद्यस्थितीत राज्यात विविध प्रवर्गांसाठी ६२ टक्के आणि आर्थिक मागास प्रवर्गासाठी (EWS) १० टक्के असे आरक्षण लागू आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता खुल्या प्रवर्गासाठी अप्रत्यक्षपणे ३८ टक्के जागा आरक्षित झाल्या आहेत, जे सामाजिक न्यायाच्या विरोधात असल्याचे पक्षाचे मत आहे.

राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणावर कुणबी दाखल्यांचे वाटप झाल्याने आता खुल्या प्रवर्गात नेमकी किती लोकसंख्या उरली आहे, याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. एकीकडे खुल्या प्रवर्गातील लोकसंख्या घटत असताना दुसरीकडे त्यांच्यासाठी ३८ टक्के जागा सुरक्षित करणे हा विरोधाभास आहे. ही परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची असल्याने जोपर्यंत ओबीसीसह सर्वच प्रवर्गांची शास्त्रोक्त जातनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत वस्तुस्थिती स्पष्ट होणार नाही. अशा स्थितीत कोणतीही ठोस आकडेवारी हाती नसताना घाईघाईने घेतलेला हा निर्णय घटनात्मक पेच निर्माण करू शकतो.

राज्य सरकारने पुरेशी आकडेवारी पडताळून न पाहता आणि जनगणनेचा आधार न घेता या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. केवळ राजकीय गणिते डोळ्यासमोर ठेवून घेतलेल्या या निर्णयामुळे गुणवत्ताधारक मागासवर्गीय उमेदवारांचे नुकसान होणार असून, सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असा इशाराही डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 212
अजित नवले राखीव प्रवर्ग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.