Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » व्यावसायिक व्यवहाराचा संशय फिर्यादीला नडला; ‘चेक बाऊन्स’ प्रकरणात संगमनेरात आरोपी दोषमुक्त
न्यायालय

व्यावसायिक व्यवहाराचा संशय फिर्यादीला नडला; ‘चेक बाऊन्स’ प्रकरणात संगमनेरात आरोपी दोषमुक्त

जर व्यवसायच सिद्ध होत नसेल किंवा तो बेकायदेशीर असेल, तर त्यातून निर्माण झालेले देणे कायदेशीर मानले जाऊ शकत नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/05/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

सोन्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून उधारीपोटी मिळालेला तीन लाख रुपयांचा धनादेश न वटल्याचा दावा करणाऱ्या फिर्यादीला न्यायालयात आपला अधिकृत व्यवसाय सिद्ध करता आला नाही. त्यामुळे न्यायालयाने संशयाचा फायदा देत आरोपीची गुन्हातून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर मधील एका महत्त्वपूर्ण फौजदारी खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चं. प्र. रघुवंशी यांनी हा निवाडा केला.

या खटल्याची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी समीर रमेश महाले (रा. जयभारत चौक, संगमनेर) यांचा सोन्याचा व्यवसाय असून आरोपी संतोष यादवराव काळे (रा. नेहरू चौक, संगमनेर) यांच्याशी त्यांची मैत्री होती. फिर्यादीच्या दाव्यानुसार, आरोपीने २० ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांच्याकडून ४ लाख ५० हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे कडे उधारीवर खरेदी केले होते. त्यापैकी काही रक्कम रोख देऊन उर्वरित ३ लाख रुपये एका महिन्याच्या आत देण्याचे आश्वासन आरोपीने दिले होते.

ठरलेल्या मुदतीनंतर फिर्यादीने पैशांची मागणी केली असता, आरोपीने बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा संगमनेरचा ३ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, फिर्यादीने हा धनादेश बँकेत जमा केला असता ‘खाते बंद’ असल्याचा शेरा मिळून तो अनादरीत झाला. यानंतर कायदेशीर नोटीस पाठवूनही रक्कम न मिळाल्याने समीर महाले यांनी न्यायालयात नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट कलम १३८ अन्वये तक्रार दाखल केली होती.

न्यायालयीन सुनावणी दरम्यान आरोपी संतोष काळे यांच्या वतीने विधीज्ञ संतोष दत्तात्रय इटप यांनी फिर्यादीच्या दाव्याला आव्हान दिले. फिर्यादीचा कोणताही सोन्याचा व्यवसाय नाही, तर ते बेकायदेशीर भिशी व व्याजाचा धंदा चालवतात. भिशीच्या सुरक्षेसाठी सुरुवातीलाच घेतलेल्या धनादेशाचा फिर्यादीने गैरवापर करून ही खोटी केस दाखल केली आहे. असा बचाव केला. आरोपीच्या बचावाला दुजोरा देण्यासाठी निलेश संजय भावसार या साक्षीदाराची साक्ष घेण्यात आली, जो पूर्वी फिर्यादीकडे वसुलीचे काम करत होता. त्यानेही फिर्यादीचा सोन्याचा व्यवसाय नसल्याचे स्पष्ट केले.

खटल्याच्या सुनावणीत फिर्यादीने सादर केलेल्या पुराव्यांवरून अनेक गंभीर बाबी समोर आल्या. फिर्यादीने ‘शिवसाई ज्वेलर्स’ नावाचे जे बिल न्यायालयात सादर केले होते, त्यावर व्हॅट आणि सीएसटी क्रमांक नमूद होते. परंतु, उलटतपासणीत फिर्यादीने मान्य केले की २०२० मध्ये जीएसटी आल्यामुळे त्यांनी व्हॅट आणि सीएसटी अकाउंट बंद केले होते, तरीही २०२२ च्या बिलावर ते क्रमांक होते. याशिवाय फिर्यादीकडे दुकानाचा कोणताही आस्थापना परवाना नव्हता, ते दुकानाची खतावणी ठेवत नव्हते, आयटी रिटर्न भरत नव्हते आणि दुकानाच्या नावे कोणत्याही बँकेत खातेही नव्हते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स नियमांनुसार आवश्यक असणारे नोंदणी प्रमाणपत्रही फिर्यादी सादर करू शकले नाहीत.

न्यायाधीश चं. प्र. रघुवंशी यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुराव्यांच्या आधारे स्पष्ट केले की, धनादेश ‘खाते बंद’ असल्यामुळे अनादरीत झाला आणि फिर्यादीने मुदतीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली, ही बाब सिद्ध होते. परंतु, ज्या मूळ व्यवसायाच्या व्यवहारातून हे कायदेशीर देणे निर्माण झाल्याचा दावा फिर्यादीने केला आहे, तो व्यवसायच संशयाच्या भोवऱ्यात आहे. लाखो रुपयांची उलाढाल असताना कोणताही कर न भरणे, बँक खाते न ठेवणे आणि परवाना असूनही तो न्यायालयात सादर न करणे यावरून भारतीय पुरावा कायद्याच्या कलम ११४ (ग) नुसार फिर्यादीच्या विरोधात प्रतिकूल अनुमान काढणे आवश्यक ठरते.

जर व्यवसायच सिद्ध होत नसेल किंवा तो बेकायदेशीर असेल, तर त्यातून निर्माण झालेले देणे कायदेशीर मानले जाऊ शकत नाही. परिणामी, आरोपीने आपल्यावरील कायदेशीर गृहीतके शक्यतांच्या आधारावर यशस्वीरीत्या खोडून काढल्याचे न्यायालयाने नमूद केले. फिर्यादीला आरोपीविरुद्ध कलम १३८ अन्वये गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे न्यायालयाने आरोपी संतोष यादवराव काळे यांची फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २५५(१) अन्वये निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,630
ॲड. संतोष इटप अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय धनादेश अनादर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.