Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिअर बार फोडणारी गँग गजाआड; साडेपाच लाखांच्या मुद्देमालासह ५ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
गुन्हेगारी

बिअर बार फोडणारी गँग गजाआड; साडेपाच लाखांच्या मुद्देमालासह ५ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

यामध्ये संगमनेर तालुका पोलीस ठाण्यांतर्गत दोन गुन्हे, नाशिकमधील वावी पोलीस ठाण्यातील एक गुन्हा आणि पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याचा समावेश असून, या टोळीकडून आतापर्यंत एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/05/2026Updated:16/05/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

संगमनेरसह अहिल्यानगर व नाशिक जिल्हा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिअर बार आणि हॉटेलचे कुलूप तोडून चोऱ्या करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मोठे यश आले आहे. पोलिसांनी या टोळीतील पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ५ लाख ५५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील खंदरमाळवाडी येथील किशोर बाळाजी डोके यांच्या ‘हॉटेल निलायम बार’चे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी ३ लाख ६ हजार १९० रुपये किमतीची विदेशी दारू, सिगारेट आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरून नेला होता. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, फुरकान शेख, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, अमृत आढाव, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत आणि चालक महादेव भांड यांचे एक विशेष पथक तयार करून रवाना करण्यात आले होते.

गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली आणि आपल्या व्यावसायिक कौशल्याचा वापर करून तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हसन हमजा कुट्टी (रा. नाशिक) हा त्याच्या साथीदारांसह नाशिकमधील म्हाडा बिल्डिंग, वडाळा परिसरात असल्याची अचूक माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने नाशिक येथे जाऊन सापळा रचला आणि संशयित आरोपी हसन हमजा कुट्टी (रा. नवनाथनगर, शेवाडी, पंचवटी, नाशिक), आकाश सचिन सूर्यवंशी (रा. सिडको, नाशिक) आणि मेहताब गुलाम रसूल अन्सारी (मूळ रा. नुरीनगर, झारखंड) यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी या तिघांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी त्यांचा आणखी एक साथीदार बंटी दास (रा. झारखंड, सध्या फरार) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारले असता, त्यांनी हा माल नाशिक जिल्ह्यातील पळसे येथील ‘हॉटेल लकी बार अँड रेस्टॉरंट’चे चालक किरण रामदास उगले आणि विवेक अरुण उगले यांना चोरीचा असल्याचे सांगून विकल्याची कबुली दिली. तसेच विवेक उगले याने चोरी करण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिल्याचे समोर आले. या माहितीवरून पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत किरण रामदास उगले (रा. सामनेर, इगतपुरी, सध्या रा. पळसे, नाशिक) याला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या किरण उगले याच्याकडून पोलिसांनी ४ लाख ५ हजार १६० रुपये किमतीची विविध कंपन्यांची विदेशी दारू, गुन्ह्यात वापरलेली १ लाख ५० हजार रुपये किमतीची टाटा इंडिका कार (क्रमांक एम.एच.४८.एफ.०७२३), कटर, मंकी मास्क, एअर पिस्टल आणि स्क्रू ड्रायव्हर असा एकूण ५ लाख ५५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पकडण्यात आलेल्या आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा परिसरात अशाच प्रकारे अनेक चोऱ्या केल्याचे उघड झाले. यामध्ये संगमनेर तालुका पोलीस ठाण्यांतर्गत दोन गुन्हे, नाशिकमधील वावी पोलीस ठाण्यातील एक गुन्हा आणि पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याचा समावेश असून, या टोळीकडून आतापर्यंत एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्ह्यातील पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना घारगाव पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले असून, घारगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 846
अहिल्यानगर एलसीबी घारगाव पोलीस टोळी बियर बार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.