Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नेहरू गार्डन शॉपिंग कॉम्प्लेक्स पाडण्याच्या हालचालींवरून संगमनेरात राजकारण तापले; शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारींचा आमदार सत्यजित तांबे यांच्यावर थेट निशाणा
राजकारण

नेहरू गार्डन शॉपिंग कॉम्प्लेक्स पाडण्याच्या हालचालींवरून संगमनेरात राजकारण तापले; शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारींचा आमदार सत्यजित तांबे यांच्यावर थेट निशाणा

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून ही शेवटची विनंती असून या कायदेशीर आणि न्याय्य मागणीचा राग येऊ नये, असा उपरोधिक सल्लाही कतारी यांनी पत्राच्या शेवटी दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/05/2026Updated:20/05/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज, संगमनेर:

संगमनेर नगरपालिकेच्या नेहरू गार्डन परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्सवरील संभाव्य कारवाईवरून आता शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. येथील गाळेधारकांवर अन्यायकारक कारवाई केली जात असल्याचा आरोप करत शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी थेट पदवीधर आमदार सत्यजित तांबे आणि नगराध्यक्ष मैथिली तांबे यांना पत्राद्वारे तीव्र नाराजीचे निवेदन पाठवले आहे.

या पत्रामध्ये कतारी यांनी सत्ताधाऱ्यांच्या ‘संगमनेर व्हिजन २.०’ वरून थेट सवाल उपस्थित करत तीक्ष्ण शब्दांत घरचा आहेर दिला आहे. आपण सर्व महाविकास आघाडीचेच कार्यकर्ते असून, ही शेवटची दाद मागत असल्याचे सांगत त्यांनी तांबे यांना या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. या पत्रामुळे आता शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ताधारी यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेहरू गार्डन येथील पालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स संदर्भात नगरपरिषदेकडून एक कथित ऑडिट अहवाल सादर करण्यात आला आहे. ही इमारत धोकादायक असल्याचे दाखवून ती पाडण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असून, त्याबाबत गाळेधारकांना लेखी नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर शॉपिंग कॉम्प्लेक्स अत्यंत सुस्थितीत आहे आणि व्यापारी किंवा नागरिकांच्या दृष्टीने कोणताही तातडीचा धोका निर्माण झालेला नाही, असा दावा अमर कतारी यांनी निवेदनात केला आहे.

या गाळेधारकांकडून नगरपालिकेला दरवर्षी तब्बल १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. असे असतानाही नगरपालिकेने ठराव क्र. ७९/२०२६ चा आधार घेत अचानक ही कारवाईचा सपाटा का लावला आहे, असा प्रश्न उपस्थित करून व्यापाऱ्यांमध्ये सध्या संभ्रम आणि भीतीचे वातावरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या २० ते २५ वर्षांपासून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या लहान व्यापाऱ्यांना उध्वस्त करून रस्त्यावर आणण्याचे काम सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून होत असल्याचा थेट आरोप कतारी यांनी केला आहे. पालिका निवडणुकीदरम्यान जर ‘संगमनेर व्हिजन २.०’ मध्ये नेहरू गार्डनचे गाळे पाडण्याचा आणि व्यावसायिकांना रस्त्यावर आणण्याचा उल्लेख केला असता, तर जनतेने ९० टक्के बहुमत देताना नक्कीच विचार केला असता, असा टोला त्यांनी लगावला.

शहराचा शाश्वत विकास होईल या अपेक्षेनेच सर्वसामान्य नागरिकांनी संगमनेर सेवा समितीला पाठिंबा दिला होता, त्यामुळे आपल्या नेतृत्वाखाली सत्ता कार्यरत असताना नागरिकांच्या या न्याय्य प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतली जावी, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांची आहे.

निवडणुकीतील आश्वासनांची आठवण करून देताना कतारी यांनी पत्रात म्हटले आहे की, घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन, अभंग मळा, सावता माळी नगर, उपनगर, मालदाड रोड, इंदिरानगर, ताजने मळा, अलका नगर, कोल्हेवाडी रोड, जोर्वे रोड आणि शहरातील अन्य भागांतील गोरगरीब शेतकरी व व्यापाऱ्यांच्या जमिनींवर टाकलेली पालिकेची आरक्षणे काढून देण्याचे सर्वात मोठे आश्वासन देऊन मते मागण्यात आली होती. लोकांनी त्या विश्वासावर निवडून दिले असताना, आता लोकांना मदत करण्याऐवजी थेट रस्त्यावर आणण्याचे काम सुरू असल्याबद्दल त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला. शहरातील वाढती अस्वच्छता, गंभीर वाहतूक समस्या आणि आरक्षित जमिनींचे प्रश्न सोडवण्याऐवजी पालिका प्रशासन लहान दुकानदारांना लक्ष्य करत असल्याची भावना शहरात निर्माण झाली आहे.

या गंभीर पार्श्वभूमीवर शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी आमदार तांबे यांच्याकडे प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यानुसार, पालिकेने सादर केलेल्या संबंधित ऑडिट अहवालाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, गाळाधारकांशी सविस्तर चर्चा करून नगरपालिकेने घेतलेला वादग्रस्त ठराव क्र. ७९ त्वरित रद्द करण्यात यावा, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी स्थानिक व्यापारी व नागरिकांना पूर्णपणे विश्वासात घेण्यात यावे आणि तोपर्यंत या ठरावांतर्गत होणारी सर्व अन्यायकारक कारवाई तात्काळ स्थगित करण्यात यावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून ही शेवटची विनंती असून या कायदेशीर आणि न्याय्य मागणीचा राग येऊ नये, असा उपरोधिक सल्लाही कतारी यांनी पत्राच्या शेवटी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,385
अमर कतारी नेहरू गार्डन शॉपिंग सेंटर सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026

कौठेमलकापूर सौरऊर्जा प्रकल्पाला स्थगिती; औद्योगिक वसाहतीचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला यश

23/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

By Annant Ppangarkar24/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या यशोधन जनसंपर्क…

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026

शिव्यांची नव्हे तर ओव्यांची संगत धरा; ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांचे प्रतिपादन

24/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.