Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार अमोल खताळ जेव्हा संगमनेरमधील वडगाव पानच्या आरटीओ कॅम्पला भेट देतात तेव्हा…
राजकारण

आमदार अमोल खताळ जेव्हा संगमनेरमधील वडगाव पानच्या आरटीओ कॅम्पला भेट देतात तेव्हा…

परिवहन मंत्र्यांशी थेट संपर्क आणि संगमनेर कार्यालयाची मागणी....
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर :
संगमनेरमध्ये आरटीओच्या माध्यमातून होणाऱ्या कॅम्पमध्ये एजंटांकडून सर्वसामान्य वाहन चालकांकडून अवाजवी पैसे घेत असल्याच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी बुधवारी वडगाव पान येथील कॅम्पला अचानक भेट दिली आणि तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधत, एजंटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या गैरप्रकारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि वाहनचालकांना थेट सेवा मिळायला हवी अशी भूमिका मांडली.

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे श्रीरामपूरच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून दर महिन्याच्या प्रत्येक बुधवारी वाहन परवाना धारक आणि वाहनचालकांसाठी विशेष कॅम्प आयोजित केला जातो. या कॅम्पमध्ये काही एजंटांकडून सर्वसामान्य वाहनचालकांकडून अवाजवी पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर खताळ यांनी अचानक घटनास्थळी दिलेली भेट महत्त्वाची ठरली आहे.
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वडगाव पान साठवण तलावात आलेले पाणी तळेगावसह २१ गावांना सोडण्याच्या कार्यक्रमासाठी आज (बुधवारी) आमदार अमोल खताळ गेले होते. हा कार्यक्रम आटोपून संगमनेरकडे परतत असताना, त्यांनी वडगाव पान येथील आरटीओ कॅम्पमध्ये चाललेल्या कामकाजाची आणि नागरिकांच्या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता कॅम्पला भेट दिली.
लोकप्रतिनिधींनी अचानक भेट दिल्याने कॅम्पमधील आरटीओ अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची काही काळ धांदल उडाली. आमदारांनी स्वतः पुढे होऊन तिथे उपस्थित असलेल्या वाहनचालकांशी संवाद साधला आणि त्यांना येत असलेल्या अडचणी समजून घेतल्या.
याप्रसंगी अधिकाऱ्यांना सूचना देताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, शासनाच्या विविध सेवा सहज आणि सुलभपणे मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. त्यासाठी त्यांना एजंटांच्या दारात जावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सर्वसामान्य वाहनचालकांची कोणत्याही स्तरावर अडवणूक किंवा आर्थिक लूट होत असेल, तर ती तात्काळ बंद झाली पाहिजे. कार्यालयाच्यावतीने सामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा नाहक त्रास होता कामा नये, असे निर्देश त्यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.परिवहन मंत्र्यांशी थेट संपर्क आणि संगमनेर कार्यालयाची मागणी….
वडगाव पान येथील आरटीओ कॅम्पच्या ठिकाणाहूनच आमदार खताळ यांनी थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी त्यांनी परिवहन विभागाच्या ग्रामीण भागातील कामकाजात अधिक सुधारणा करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, तसेच संगमनेर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सुरू करण्याबाबत आग्रही विनंती केली. आमदारांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, ज्या अधिकाऱ्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि संगमनेरच्या मागणीबाबत योग्य पावले उचलली जातील, असे आश्वासन परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,161
अमोल खताळ आरटीओ कॅम्प भेट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.