Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कथित वारकऱ्यांच्या बुवाबाजीवर सवाल करणाऱ्या लवांडेना अटक
राजकारण

कथित वारकऱ्यांच्या बुवाबाजीवर सवाल करणाऱ्या लवांडेना अटक

लवांडे यांनी अटकपूर्व जामिनाच्या अर्जात स्वत:विरोधातील पूर्वी दाखल असलेल्या 4 गुन्ह्यांची माहिती लपविल्याचं समोर आलं. त्यामुळे सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी न्यायालयात आक्षेप घेत लवांडेंच संरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

वारकरी संप्रदायात घुसखोर असल्याचं म्हणत विकास लवांडे यांनी काही जणांची यादी जाहीर केली होती. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात विकास लवांडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल नोंदवण्यात आला होता. पण, लवांडेंना अतिरिक्त सत्र न्यायालयाने 20 मेपर्यंत अटकपूर्ण जामीन मंजूर केला होता. तसेच तपास अधिकारी, सरकारी पक्ष आणि वाघोली पोलिसांना भूमिका मांडण्याचे निर्देश दिले होते. मात्र 20 तारीख पूर्ण होताच पुण्यातील वाघोली पोलिसांनी विकास लवांडे यांना अटक केली आहे.

याप्रकरणी आता संताप व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक करण्यातच्या कृतीचा जोरदार निषेध केला आहे.

राज्याचं गृहखातं नेमकं कोणत्या दिशेने काम करतंय? हा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी ही गेल्या काही दिवसांतील पुणे शहर आणि परिसरातील प्रमुख हिंसक घटनांची ही यादी. गुन्हेगारीबाबत महाराष्ट्रात पुणे शहराचा पहिला तर भारतात पाचवा क्रमांक लागतो. केंद्र सरकारची आकडेवारीच हे स्पष्टपणे सांगत आहे. दिवसाढवळ्या खून होतात, गॅंगवॉर होते, रस्त्यावर रक्तपात होतो, महिलांवर-चिमुरड्यांवर अत्याचार होतो, राजकीय कार्यकर्त्यांना अटक होते आणि गुंडांना मात्र मोकळं रान मिळतं. या सर्व गोष्टी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती सांगायला पुरेशा आहेत, अशा शब्दात सुळे यांनी राज्यातील गुन्हेगारीवर भाष्य केलं.

देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जनता प्रश्न विचारतेय की, हिंसेचं हे रक्तरंजीत दुष्टचक्र कधी थांबणार आहे का? एवढ्या घटना सातत्याने आसपास घडत असताना देखील गृहखातं हाताची घडी, तोंडावर बोट अशा अवस्थेत का बसलंय? जनतेला उत्तरं हवी आहेत आणि कठोर कृती देखील. जनता दहशतीच्या छायेखाली असताना गृहमंत्रालय मात्र सुस्त आहे. गुन्हेगारांना फ्री हॅंड द्यायचा आणि दुसरीकडे विकास लवांडे यांच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना सूड भावनेतून अटक करायची, ही कुठली पद्धत? असा प्रश्न उपस्थित करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनता आपल्याकडून न्याय मागतेय.

दरम्यान, वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विकास लवांडे यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने 20 मेपर्यंत अटकपूर्ण जामीन मंजूर केला होता. मात्र विकास लवांडे यांनी अटकपूर्व जामिनाच्या अर्जात स्वत:विरोधातील पूर्वी दाखल असलेल्या 4 गुन्ह्यांची माहिती लपविल्याचं समोर आलं. त्यामुळे सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी न्यायालयात आक्षेप घेत लवांडेंच संरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती.

न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत विकास लवांडे यांना अटकपूर्व जामीन रद्द केला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी तत्काळ विकास लवांडे यांना अटक केली. मात्र दुसरीकडे छत्रपती शिवारायांची बदनामी करणाऱ्या सत्ताधारी समर्थक कथित वारकऱ्यांची गृह खात्याने जराही दखल न घेतल्याबद्दल वारकऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 526
अटक विकास लवांडे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.