Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये घरफोडी; सव्वादोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये घरफोडी; सव्वादोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि पोलीस उपनिरीक्षक सातपुते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: 

तालुक्यातील चिंचोली गुरव शिवारातील पारेगाव रोड येथील आभाळे वस्तीवर एक धक्कादायक घरफोडीची घटना समोर आली आहे. एका अज्ञात चोराने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे २ लाख १३ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन गंगाधर सोनवणे (वय ४३, रा. पारेगाव रोड, आभाळे वस्ती, चिंचोली गुरव, ता. संगमनेर) आपल्या कुटुंबासह राहत असून गुरुवारी (दिनांक २१ मे २०२६) रात्री ११:३० वाजेच्या सुमारास ते झोपलेले होते. त्यावेळी घर बंद असताना, शुक्रवारी (दिनांक २२ मे २०२६) पहाटे ४:३० वाजेच्या दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरातील मौल्यवान ऐवजावर डल्ला मारला.

या घरफोडीमध्ये एकूण २ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. यामध्ये ६० हजार रुपये किमतीचे १ तोळा वजनाचे सोन्याचे मणी व काळे मणी असलेले मणिमंगळसूत्र, ६० हजार रुपयांचे तसेच दुसरे एक तोळ्याचे मणिमंगळसूत्र, २४ हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले टॉप्स आणि साखळीचे लटकन, १८ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, ३० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व दोन सोन्याची वाटी असलेले मणिमंगळसूत्र, १५०० रुपये किमतीची चांदीची चैन व अंगठी आणि घरात ठेवलेली २० हजार रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.

घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि पोलीस उपनिरीक्षक सातपुते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तातडीने श्वानपथक, फिंगर प्रिंट तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.

फिर्यादी सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते या करत आहेत. या घटनेमुळे परिसर भागात घबराटीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 829
घरफोडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.