Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सापळा रचला, रंगेहात पकडलं… मग लाचखोराने थेट धावत्या गाडीतूनच फेकले पैसे
गुन्हेगारी

सापळा रचला, रंगेहात पकडलं… मग लाचखोराने थेट धावत्या गाडीतूनच फेकले पैसे

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी व सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून उपअधीक्षक एकनाथ पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. पथकात पोलीस हवालदार योगेश साळवे, चेतन शेवाळे व पोलीस नाईक परशुराम जाधव यांचा समावेश होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक:

सात-बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्याला आणि त्याला मदत करणाऱ्या एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. देवळा तालुक्यातील खामखेडा येथे ही धडक कारवाई करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, अटक केल्यानंतर शासकीय वाहनातून नेत असताना संशयित तलाठ्याने लाचेची रक्कम गाडीबाहेर फेकून पुरावा नष्ट करण्याचा ‘फिल्मी’ प्रयत्न केला, मात्र एसीबीच्या सतर्कतेमुळे त्याचा हा डाव पुरता फसला.

पप्पू काशिनाथ सोनकांबळे (वय ४६, रा. देवळा) असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून प्रशांत दावल सोनवणे (वय २४) असे त्याला मदत करणाऱ्या मजुराचे नाव आहे. या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण? – खामखेडा शिवारात एका शेतकऱ्याची जमीन आहे. या जमिनीवरील बहिणीचे नाव हक्कसोड पत्रान्वये कमी करण्यासाठी त्यांनी तलाठी पप्पू सोनकांबळे याच्याकडे अर्ज केला होता. मात्र, तलाठ्याने बहिणीच्या नावासोबत मूळ तक्रारदार शेतकऱ्याचेही नाव सात-बारावरून कमी करून टाकले. हा गोंधळ समोर आल्यानंतर शेतकऱ्याने विचारणा केली असता, नाव पुन्हा सात-बारावर चढवण्यासाठी तलाठ्याने ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तर खाजगी व्यक्ती प्रशांत सोनवणे याने शेतकऱ्याला लाच देण्यासाठी प्रवृत्त केले.

शेतकऱ्याने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचून ५ हजार रुपयांची लाच घेताना तलाठी सोनकांबळे आणि त्याच्या साथीदाराला रंगेहात पकडले. कारवाईनंतर दोघांना शासकीय गाडीत बसवून नेले जात असताना, तलाठ्याने खिशातील लाचेची रक्कम खिडकीबाहेर फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

एसीबीचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 889
तलाठी नाशिक एसीबी लाच लुचपत लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.