Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खबरदार, बकरी ईदपर्यंत तालुक्यात दिसाल तर! या १९ जणांना प्रवेशबंदी; अपर पोलीस अधीक्षकांचे आदेश
गुन्हेगारी

खबरदार, बकरी ईदपर्यंत तालुक्यात दिसाल तर! या १९ जणांना प्रवेशबंदी; अपर पोलीस अधीक्षकांचे आदेश

अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

संगमनेर तालुका महसूल स्थळ सीमा हद्दीत तब्बल १९ जणांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी श्रीरामपूर विभागाचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. हा प्रवेशबंदीचा आदेश शनिवारपासूनच (दिनांक २३ मे) लागू झाला असून, तो दिनांक २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत कार्यान्वित राहणार आहे. या कालावधीत संबंधित व्यक्तींना संगमनेर तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विविध पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या आणि शांततेस बाधा ठरण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींवर ही कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अलीम जलील कुरेशी, हश्मी नासीर कुरेशी, मुदस्सर अब्दुल करीम कुरेशी, कमरअली गुलाम दिलानी सौदागर, अनिस गुलाम हैदर कुरेशी, काशिद असद कुरेशी आणि रेहान गुलाबनबी कुरेशी यांचा समावेश आहे.

तसेच संगमनेर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे गणेश दगडु कदम, यासीर अकबर कुरेशी, अन्वर मोहमंद कुरेशी, बाळा रमेश रुपवते आणि सोमनाथ मारुती रुपवते यांच्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

याशिवाय आश्वी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे मुबारक रशिद शेख व अन्वर नबाब शेख आणि घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील इकरार इसकार मोमीन अकोले पोलीस स्टेशन हद्दीतील भिमा दगडु कांगणे, सुनिल भाऊसाहेब खरात आणि सचिन सुदाम जाधव राजुर पोलीस स्टेशन हद्दीतील शाहरुख निसार शेख अशा एकूण १९ जणांविरुद्ध हे प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,683
प्रवेश बंदी बकरी ईद सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.