Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगरमध्ये ५५ बालविवाह रोखले, १५ कुटुंबांवर गुन्हे दाखल
महाराष्ट्र संवाद विशेष

अहिल्यानगरमध्ये ५५ बालविवाह रोखले, १५ कुटुंबांवर गुन्हे दाखल

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा घटनांची माहिती तात्काळ १०९८ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून द्यावी. याशिवाय जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा जिल्हा चाइल्ड हेल्पलाइन १०९८ केंद्राशी थेट संपर्क साधून तक्रार नोंदवावी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर:

          गेल्या एका वर्षात म्हणजेच १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत जिल्हा बाल संरक्षण कक्षाला अहिल्या नगर जिल्ह्यात तब्बल ५५ बालविवाह रोखण्यात मोठे यश आले आहे. या कारवाईदरम्यान बालविवाहाचे उल्लंघन करणाऱ्या १५ कुटुंबांविरोधात एफआयआर (गुन्हे) दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांनी दिली आहे.

जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध कायद्याची अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असून, महिला व बाल विकास विभागाच्या वतीने “बालविवाह मुक्त भारत” अभियान मोठ्या जोमाने राबविले जात आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात बालविवाहाच्या प्रथेला पूर्णपणे आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी पथनाट्ये, चिकटपत्रके आणि पोस्टर्स यांसारख्या विविध प्रभावी माध्यमांचा वापर करून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. “बालविवाह मुक्त भारत” अभियानांतर्गत बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्यांच्या अधिकृत नोंदी ठेवणे, विविध जनजागृतीपर उपक्रम राबविणे आणि नागरिकांना बालविवाह विरोधी शपथ देणे यांसारख्या उपक्रमांवर भर दिला जात आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नागरिकांनी बालविवाह न करण्याची आणि त्याला विरोध करण्याची सामूहिक शपथ घेतली आहे.

महाराष्ट्रात कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास किंवा त्याबाबत कोणतीही शंका अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा घटनांची माहिती तात्काळ १०९८ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून द्यावी. याशिवाय जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा जिल्हा चाइल्ड हेल्पलाइन १०९८ केंद्राशी थेट संपर्क साधून तक्रार नोंदवावी, जेणेकरून अशा कुप्रथांना वेळीच आळा घालता येईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 221
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बालविवाह बालविवाह प्रतिबंध कायदा संजय कदम
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.