Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सुटीचा आनंद विरला काळोखात: कश्यपी धरणावर दोन वर्षांची चिमुरडी बचावली, संगमनेरच्या दांपत्यासह चौघांचा बुडून दुर्दैवी अंत
महाराष्ट्र संवाद विशेष

सुटीचा आनंद विरला काळोखात: कश्यपी धरणावर दोन वर्षांची चिमुरडी बचावली, संगमनेरच्या दांपत्यासह चौघांचा बुडून दुर्दैवी अंत

मूळचे संगमनेरच्या पिंपरणे गावचे असलेले ठोंबरे दांपत्य आणि मखमलाबाद येथील दोन कोवळ्या मुलांचा असा अचानक अंत झाल्याची बातमी समजताच पिंपरणे गावासह मखमलाबाद परिसरावर शोककळा पसरली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/05/2026Updated:27/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक:

उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या शेजाऱ्यांवर काळाने घाला घातल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना कश्यपी धरणावर घडली आहे. या भीषण दुर्घटनेत एकाच परिसरातील चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, यामुळे संपूर्ण परिसरात आणि मूळ गावी तीव्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, एका धाडसी महिलेच्या सतर्कतेमुळे दोन वर्षांची चिमुरडी सुदैवाने बचावली असली, तरी तिच्या डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र कायमचे हरवले आहे.

मूळचे संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील रहिवासी असलेले सचिन कैलास ठोंबरे हे सध्या नाशिकच्या मखमलाबाद भागात वास्तव्यास होते. सुटी साजरी करण्यासाठी सचिन ठोंबरे, त्यांची पत्नी रोहिणी, दोन वर्षांची मुलगी आणि त्यांच्या शेजारी राहणारी दोन मुले असे सर्वजण मंगळवारी हरसूल-त्र्यंबकेश्वर जवळील कश्यपी धरणावर फिरण्यासाठी गेले होते.

धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि निसर्गरम्य वातावरण पाहून संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास हे सर्वजण पाण्यात पोहण्याचा व आंघोळीचा आनंद घेण्यासाठी उतरले. मात्र, धरणाच्या पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने अचानक त्यापैकी एकजण खोल पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर तिघेजणही एकापाठोपाठ एक पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले.

एकमेकांना वाचवण्याच्या या आकांतामध्ये सचिन ठोंबरे, त्यांची पत्नी रोहिणी आणि शेजारी राहणारे केतन अनिल पवार (१६) व कौशल अनिल पवार (१४) या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

या संपूर्ण दुर्घटनेत ठोंबरे दांपत्याची दोन वर्षांची चिमुरडी मुलगी मात्र सुदैवाने बचावली. ती धरणाच्या काठावर एकटीच पाण्याच्या दिशेने जात असल्याचे तेथून जाणाऱ्या संगीता घाडगे या महिलेच्या निदर्शनास आले. लहान बाळ एकटेच पाण्यात जात असल्याचे पाहून संगीता यांनी कसलाही विचार न करता धाव घेतली आणि त्या मुलीला सुखरूप पाण्यातून बाहेर काढले. मात्र, बाहेर आल्यानंतर ती चिमुरडी रडत-रडत ‘मम्मी-पप्पा’ म्हणत पाण्याचा दिशेने बोट दाखवू लागली.

बाजूलाच पडलेले चपलांचे जोड आणि मुलीचे रडणे पाहून तिथे काहीतरी मोठी दुर्घटना घडल्याचा संशय संगीता घाडगे यांना आला. त्यांनी तातडीने आरडाओरड करून धरणाजवळ कुस्तीच्या स्पर्धेसाठी जमलेल्या स्थानिक नागरिकांना आणि तरुणांना मदतीसाठी बोलावले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता खोल पाण्यात उड्या घेतल्या आणि बुडणाऱ्यांचा शोध सुरू केला. काही वेळातच त्यांनी चौघांनाही पाण्याच्या बाहेर काढले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचाही जीव गेला होता. मृत महिलेच्या मोबाईलवर आलेल्या फोन कॉल्सवरून अखेर या मृतांची ओळख पटली आणि त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्यात आला.

मूळचे संगमनेरच्या पिंपरणे गावचे असलेले ठोंबरे दांपत्य आणि मखमलाबाद येथील दोन कोवळ्या मुलांचा असा अचानक अंत झाल्याची बातमी समजताच पिंपरणे गावासह मखमलाबाद परिसरावर शोककळा पसरली आहे. केवळ दोन वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यात यश आले असले, तरी तिचे आई-वडील आता कधीही परत न येणाऱ्या जगात निघून गेले आहेत, ही जाणीव उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारी होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 3,080
कश्यपी धरण दुर्दैवी घटना धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.