Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘यासाठी’ वेदांत वाईन्सला नगरपरिषदेची नोटीस
प्रशासन

‘यासाठी’ वेदांत वाईन्सला नगरपरिषदेची नोटीस

वाहतूक आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे प्रत्येक व्यावसायिकाची जबाबदारी आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड होऊ देणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल." — दयानंद गोरे, मुख्याधिकारी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/06/2026Updated:02/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, ग्राहकांच्या वाहनांची बेशिस्त पार्किंग तसेच परिसरात अस्वच्छता निर्माण केल्याप्रकरणी संगमनेर नगरपरिषदेने वेदांत वाईन्सला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या वेदांत वाईन्ससमोर दररोज सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असते. मद्य खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. हा मार्ग शहरातील प्रमुख व वर्दळीचा असल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याची बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे.
तसेच काही मद्यधुंद व्यक्तींकडून परिसरात गोंधळ घालण्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि वाहतुकीच्या सुरळीततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेत नगरपरिषदेने संबंधित वाईन्स व्यवस्थापनाला गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करणे, वाहनतळाचे नियोजन करणे आणि ग्राहकांकडून होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याशिवाय वेदांत वाईन्सकडून दैनंदिन घनकचरा नगरपरिषदेच्या घंटागाडीत न देता सार्वजनिक ठिकाणी टाकला जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण होत असून नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणी संबंधितांना तीन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समाधानकारक खुलासा न केल्यास ५० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधित वाईन्सचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन घेतला जाईल, तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याचे पुन्हा आढळल्यास पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही नगरपरिषदेने दिला आहे.

“वाहतूक आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे प्रत्येक व्यावसायिकाची जबाबदारी आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड होऊ देणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
— दयानंद गोरे, मुख्याधिकारी, संगमनेर नगरपरिषद

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,754
कारवाई दयानंद गोरे नोटीस वेदांत वाईन्स संगमनेर नगर परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

संगमनेरमध्ये डीजे नियमांचे उल्लंघन; ६ जणांवर गुन्हा दाखल

25/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.