Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नातवाला वाचवताना आजोबांचाही शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; संगमनेर तालुक्यातील येथील घटना

August 10, 2026

सोमवार, १० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 10, 2026

नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी संगमनेरमध्ये चक्काजाम; रस्त्यावर जनसागर उसळला!

August 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नातवाला वाचवताना आजोबांचाही शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; संगमनेर तालुक्यातील येथील घटना
महाराष्ट्र संवाद विशेष

नातवाला वाचवताना आजोबांचाही शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; संगमनेर तालुक्यातील येथील घटना

पांडुरंग रखमा गुळवे (वय ६५) आणि सर्वेश संतोष गुळवे (वय १३, दोघेही रा. गुळवे वस्ती, सावरगाव तळ, ता. संगमनेर) अशी मृत झालेल्या आजोबा-नातवाची नावे आहेत
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 10, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर: 

नातवाला वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी घेतलेल्या आजोबांचा नातवासोबतच बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. 

या अपघातामुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. पांडुरंग रखमा गुळवे (वय ६५) आणि सर्वेश संतोष गुळवे (वय १३, दोघेही रा. गुळवे वस्ती, सावरगाव तळ, ता. संगमनेर) अशी मृत झालेल्या आजोबा-नातवाची नावे आहेत.

गुळवे वस्तीवर राहणाऱ्या गुळवे कुटुंबाच्या घराशेजारीच शेततळे आहे. रविवारी सायंकाळी सर्वेशचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. हा प्रकार त्याच्या मोठ्या बहिणीच्या लक्षात येताच तिने तात्काळ आरडाओरड केली. आवाज ऐकून जवळच असलेल्या आजोबा पांडुरंग गुळवे यांनी क्षणाचाही विचार न करता नातवाचे प्राण वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी घेतली. मात्र, शेततळ्याच्या प्लास्टिक कागदावरील निसरडेपणा आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात अडकले आणि त्यांना बाहेर पडता आले नाही.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच दोघांना मृत घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांनी दिलेल्या माहितीवरून संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 431
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

August 4, 2026

पठारभागाला वरदान ठरणारे ‘कोटमारा धरण’ ओव्हरफ्लो

August 4, 2026

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संगमनेरकर अजिंक्य राहाणेची निवृत्ती; भावुक होत व्यक्त केला कृतज्ञता भाव

July 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

नातवाला वाचवताना आजोबांचाही शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; संगमनेर तालुक्यातील येथील घटना

By अनंत पांगारकरAugust 10, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर:  नातवाला वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी घेतलेल्या आजोबांचा नातवासोबतच बुडून दुर्दैवी मृत्यू…

सोमवार, १० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 10, 2026

नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी संगमनेरमध्ये चक्काजाम; रस्त्यावर जनसागर उसळला!

August 9, 2026

रविवार विशेष लेख — रामाचं सोंग आणि धर्माचं ढोंग!

August 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.