Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये विनापरवाना वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा; ट्रॅक्टरसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

24/09/2026

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये विनापरवाना वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा; ट्रॅक्टरसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये विनापरवाना वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा; ट्रॅक्टरसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी खांडगाव येथील रहिवासी अभिषेक प्रभाकर गुंजाळ (वय २९) आणि गणेश अशोक बालोडे (वय ३२) या दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहरात बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर आणि वाळू असा एकूण ६ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथक गुरुवारी पहाटे (२४ सप्टेंबर) संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, खांडगाव चौफुला कडून वैदुवाडीकडे लाल रंगाच्या ट्रॅक्टरमधून अवैध वाळू वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने खांडगाव रोडवर सापळा रचून संशयास्पद ट्रॅक्टर अडवला. ट्रॅक्टर ट्रॉलीची पाहणी केली असता त्यात बेकायदेशीर वाळू आढळून आली.

याप्रकरणी खांडगाव येथील रहिवासी अभिषेक प्रभाकर गुंजाळ (वय २९) आणि गणेश अशोक बालोडे (वय ३२) या दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता आरोपींकडे कोणताही परवाना उपलब्ध नव्हता. पोलिसांनी ६ लाख रुपये किमतीचा महिंद्रा ट्रॅक्टर-ट्रॉली आणि १० हजार रुपयांची वाळू असा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२), ३(५) सह पर्यावरण संरक्षण कायद्यातील कलम ३ व १५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, निळकंठ कारखेले, सोमनाथ झांबरे, रणजीत जाधव, बाळासाहेब गुंजाळ आणि सतीश भवर यांच्या पथकाने सहभाग घेतला असून संगमनेर शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 284
अवैध वाळू वाहतूक अहिल्यानगर एलसीबी एलसीबी कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात २८ सप्टेंबरला बालकुमार साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी – दुर्गाताई तांबे

23/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये विनापरवाना वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा; ट्रॅक्टरसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar24/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहरात बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई…

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.