Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बनावट दारूचे रॅकेट उद्ध्वस्त; नेहरू चौकातील हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले धागेदोरे, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

August 10, 2026

नातवाला वाचवताना आजोबांचाही शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; संगमनेर तालुक्यातील येथील घटना

August 10, 2026

सोमवार, १० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये बनावट दारूचे रॅकेट उद्ध्वस्त; नेहरू चौकातील हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले धागेदोरे, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त!
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये बनावट दारूचे रॅकेट उद्ध्वस्त; नेहरू चौकातील हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले धागेदोरे, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

संगमनेर शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत बनावट व प्रतिबंधित दारूचे रॅकेट उद्ध्वस्त केले असून, बनावट दारू प्रकरणी शहरात खळबळ उडाली आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 10, 2026Updated:August 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर | अनंत पांगारकर
गोवा बनावटीच्या आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दारूची अवैध तस्करी, विक्री व बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. या धडक कारवाईत गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स, नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे आणि दुचाकी वाहन असा तब्बल ५ लाख ३८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (८ ऑगस्ट) रोजी रात्री संगमनेर शहरातील जनता राजा मैदानाजवळील शिवाजीनगर परिसरातील एका घरात गोवा राज्यातील प्रतिबंधित मद्याचा मोठा साठा असल्याची खात्रीशीर बातमी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. बातमीच्या आधारे पथकाने तातडीने रचून छापा टाकला.
या कारवाईत शिवकुमार मनोजकुमार कालडा आणि सौरभ अरविंद पापडेजा (दोघे रा. संगमनेर) या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून ‘रॉयल इम्पॅक्ट’ व्हिस्कीचे ३४ बॉक्स, विविध नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे आणि वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली.
नवा ट्विस्ट – ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, ही तयार केलेली बनावट दारू नेहरू चौकातील ‘हॉटेल सुरभी एफ.एल.-३’ (परवाना क्र. १९३) येथे विक्रीसाठी पाठवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा झाला. या माहितीनंतर पथकाने लागलीच हॉटेल सुरभीवर छापा मारून ६१ हजार ३१० रुपये किमतीच्या बनावट दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना ९ ऑगस्ट रोजी संगमनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; कठोर कारवाईची मागणी – शहरासह तालुकाभरात परराज्यातून बनावट दारूची तस्करी होत असल्याचे समोर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी व पैशांच्या हावेपोटी लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संगमनेरकरांमधून होत आहे.
दरम्यान, ग्राहकांनी कोणत्याही अनधिकृत किंवा संशयास्पद ठिकाणाहून दारू खरेदी करू नये. मद्य खरेदी करताना ते अधिकृत परवानाधारक दुकानातूनच घ्यावे आणि बाटलीवरील सील व लेबल तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अवैध दारूची निर्मिती, वाहतूक किंवा विक्री आढळल्यास नागरिकांनी त्वरित उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.
कारवाई करणारे पथक – ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक योगेश सावखेडकर, उपनिरीक्षक प्राची देखणे, उपनिरीक्षक प्रशांत गायकवाड, वसंत पालवे, विपुल कर्पे, विमल घोलप, स्वाती फटांगरे, मोहिनी घोडेकर, सचिन बटुळे व ओंकार पालवे या भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक प्राची देखणे करीत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 40
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ९ लाख २ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली

August 8, 2026

महावितरण कर्मचाऱ्याला धमकी देवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राजापूरच्या प्रमोद हासेवर गुन्हा दाखल

August 6, 2026

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

August 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये बनावट दारूचे रॅकेट उद्ध्वस्त; नेहरू चौकातील हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले धागेदोरे, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

By अनंत पांगारकरAugust 10, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर | अनंत पांगारकर गोवा बनावटीच्या आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दारूची…

नातवाला वाचवताना आजोबांचाही शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; संगमनेर तालुक्यातील येथील घटना

August 10, 2026

सोमवार, १० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 10, 2026

नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी संगमनेरमध्ये चक्काजाम; रस्त्यावर जनसागर उसळला!

August 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.