Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

30/09/2026

बुधवार ३० सप्टेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निसर्गाची मनमोहक उधळण! चंदनापुरी घाटातील प्रवाहित ‘तामकड्या’चे डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते जलपूजन
महाराष्ट्र संवाद विशेष

निसर्गाची मनमोहक उधळण! चंदनापुरी घाटातील प्रवाहित ‘तामकड्या’चे डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते जलपूजन

हिरव्यागार वनराईच्या कुशीतून वाहणारा हा पांढराशुभ्र धबधबा परिसरातील नागरिकांसह प्रवाशांसाठी मोठा आनंददायी ठरत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर (प्रतिनिधी):
नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरलेला निसर्गरम्य ‘तामकडा’ धबधबा प्रवाहित झाला असून या तामकड्याचे जलपूजन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. हिरव्यागार वनराईच्या कुशीतून वाहणारा हा पांढराशुभ्र धबधबा परिसरातील नागरिकांसह प्रवाशांसाठी मोठा आनंददायी ठरत आहे.
जलपूजनानंतर बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, अकोले व संगमनेर तालुका हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य परिसर आहे. बाळेश्वर पर्वतावरून वाहणाऱ्या नदीमुळे घाटातील हा सुंदर तामकडा निर्माण झाला असून पावसाळ्यात तो पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. नाशिक-पुणे महामार्गावरून प्रवास करताना अनेक पर्यटक व नागरिक या ठिकाणी थांबून निसर्गाचा आनंद घेतात. मात्र, पर्यटनाचा आनंद लुटताना तरुणांनी सेल्फी घेण्याचा मोह टाळून स्वतःच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण व कॉंक्रिटीकरण पूर्ण होऊन घाटात अद्ययावत रस्ता तयार झाला आहे, यामुळे अपघात रोखण्यास मदत झाली आहे. तसेच तालुक्यात बंधारे आणि नालाबंडिंगचे जाळे निर्माण केल्यामुळे मोठी जलसंपत्ती साठवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भविष्यात कमी पाण्यात जास्त उत्पादन देणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रसंगी थोरात कारखान्याचे संचालक विजय राहणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, परिसरात बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे मोठी जलसमृद्धी निर्माण झाली असून हा तामकडा आनंदवाडी व चंदनापुरी परिसरासाठी वरदान ठरेल.
या जलपूजन सोहळ्यास कैलास सरोदे, अनिल कढणे, मुरलीधर सरोदे, पप्पू गोसावी, विनोद राहणे, दगू राहणे, ज्ञानेश्वर सरोदे, निलेश सरोदे, अर्चना भालेराव, जयसिंग सरोदे, नंदू राहणे, सोमनाथ सरोदे, भाऊराव रहाणे, बबन सरोदे, बाबाजी सरोदे, जगन राहणे, रविराज सरोदे यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 511
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

By Annant Ppangarkar30/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचे राजकीय वजन कमी झाल्याचा दावा करणाऱ्यांना…

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

30/09/2026

बुधवार ३० सप्टेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

30/09/2026

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.