Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दुष्काळसदृश परिस्थितीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

24/09/2026

संगमनेरमध्ये विनापरवाना वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा; ट्रॅक्टरसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

24/09/2026

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चहा पिण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी आजींच्या गळ्यातील सोन्याची पोत पळवली
गुन्हेगारी

चहा पिण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी आजींच्या गळ्यातील सोन्याची पोत पळवली

आश्‍वी परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
आश्वी परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या एका धक्कादायक घटनेत अज्ञात दोन भामट्यांनी एका ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. आश्वी-प्रतापपूर रस्त्यावरील आंधळे पेट्रोल पंपाजवळ बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली असून, या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रतापपूर येथील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय शकुंतला गंगाधर चतुरे या आंधळे पेट्रोल पंपाजवळ चहाची टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास त्या दुकानात असताना दोन अज्ञात इसम तेथे आले. त्यांनी चहा मागण्याच्या बहाण्याने शकुंतला यांच्याशी संवाद साधला.
दुकानात आणि आसपास गर्दी नसल्याचा फायदा घेत या भामट्यांनी अचानक शकुंतला यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किंमतीची व एक तोळा वजनाची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेतली. शकुंतला काही समजायच्या आतच चोरट्यांनी आपल्या दुचाकीवरून क्षणात पळ काढला.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे भयभीत झालेल्या शकुंतला चतुरे यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटे दूर निघून गेले होते. या घटनेनंतर घाबरलेल्या शकुंतला यांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्‍वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १६२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) अन्वये दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरदिवसा आणि गजबजलेल्या रस्त्यानजीक घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे आश्वी परिसरातील नागरिकांमध्ये, विशेषतः एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, या सराईत चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 584
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026

प्रांताधिकारी कार्यालयात गोंधळ; गुन्हा दाखल

23/09/2026

आश्वी परिसरात अवैध धंद्यांचा धुमाकूळ; पोलिसांच्या दुर्लक्षावर ग्रामस्थांचा संताप, कारवाईकडे लक्ष

23/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

दुष्काळसदृश परिस्थितीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

By Annant Ppangarkar24/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पावसाच्या खंडामुळे संकट सापडलेल्या शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी शासन पूर्णपणे खंबीर…

संगमनेरमध्ये विनापरवाना वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा; ट्रॅक्टरसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

24/09/2026

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.