Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रींचे आगमन अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपले असताना संगमनेर स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांमधून प्रचंड तीव्र संताप व्यक्त होत आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –
शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘शांतता समिती बैठक’ आयोजित करण्याचा विसर प्रशासनाला पडला की बैठक जाणीवपूर्वक टाळली आहे. शांतता समितीच्या माध्यमातून प्रशासनाच्या उणिवांवर बोट ठेवून जबाबदार अधिकाऱ्यांना प्रश्न, जाब विचारण्याचा संगमनेरकरांचा हक्कच प्रशासनाने हिरावून घेतल्याचा थेट आणि गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संगमनेर शहर प्रमुख अमित चव्हाण यांनी केला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रींचे आगमन अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपले असताना संगमनेर स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांमधून प्रचंड तीव्र संताप व्यक्त होत आहे.
इतिहासात संगमनेर शहराची अतिसंवेदनशील म्हणून नोंद असल्याने कोणत्याही मोठ्या धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. गेल्या काही काळात संगमनेरने शांतता आणि सामाजिक सौहार्दाच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली असली, तरी पुन्हा एकदा शहरात विघ्नसंतोषी प्रवृत्ती डोके वर काढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासारख्या भव्य आणि संवेदनशील सणासाठी दरवर्षी पोलीस प्रशासनाकडून शांतता समितीची बैठक आयोजित करणे अनिवार्य मानले जाते. या बैठकीत मुख्यत्वे मिरवणूक मार्ग, प्रवरा नदीपात्रातील पाण्याची स्थिती, वीज पुरवठा, वाहतूक कोंडीची समस्या, गुन्हेगारी प्रवृत्तींवर झालेली कारवाई आणि आगामी काळात प्रशासनाची सतर्कता यावर सविस्तर चर्चा केली जाते.
शांतता समितीच्या बैठकीमध्ये संगमनेरकर नागरिक आणि विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी प्रशासनासमोर समस्यांचा पाढा वाचतात आणि अनेकदा अधिकाऱ्यांना जाब विचारतात. या चर्चेतून कधीकधी वातावरणात काही काळ तणाव निर्माण होत असला, तरी अखेर याच बैठकीच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद घडवून आणण्यास मदत होते. शहराची शांतता अबाधित ठेवण्यासाठी सर्व गणेश मंडळे एकजुटीने काम करत असली, तरी काही विघ्नसंतोषी लोकांमुळे उत्सवाला गालबोट लागण्याचा धोका कायम असतो. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने नेमकी काय तयारी केली आहे, याची ठोस माहिती मिळणे संगमनेरकरांसाठी अत्यंत गरजेचे असते.
विशेष म्हणजे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी अहमदनगर जिल्ह्यातील इतर अनेक ठिकाणी स्वतः बैठका घेऊन गणेशोत्सव तयारीचा आढावा घेतला आहे. मात्र, संगमनेरमधील स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अद्याप एकही बैठक न घेतल्यामुळे यंदा शांतता समितीच्या परंपरेत मोठा खंड पडण्याची चिन्हे आहेत. सण अवघ्या काही तासांवर आला तरी प्रशासनाची ही उदासीनता कायम असल्याने, अधिकाऱ्यांच्या या मनमानी आणि बेजबाबदार कारभाराविरोधात संगमनेरकरांमध्ये तीव्र रोष निर्माण होण्याची शक्यता अमित चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 78
अमित चव्हाण गणेशोत्सव शांतता समिती बैठक शिवसेना उद्धव ठाकरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.