Showing 1 of 1

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

संगमनेर येथील जेष्ठ पत्रकार विनोद बूब (वय ७८) यांचे रविवारी (दिनांक २० सप्टेंबर) पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळातून दुःख व्यक्त केले जात आहे. पत्रकार अंकुश बुब यांचे ते चुलते होते.

गेल्या काही दशकांपासून त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून संगमनेर आणि परिसरातील विविध समस्यांवर सातत्याने प्रकाश टाकला. अभ्यासू वृत्ती, समाजकार्याची आवड आणि नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करण्याची त्यांची शैली यामुळे पत्रकारिता क्षेत्रात ते परिचित होते. त्यांच्या निधनाने एका मार्गदर्शक आणि अभ्यासू पत्रकाराला समाज मुकला आहे.

त्यांची अंत्ययात्रा सोमवारी (२१ सप्टेंबर) २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघून अमरधाम येथे जाईल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली आणि बूब परिवारासह मोठा आप्तपरिवार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Showing 1 of 1
Share.
Leave A Reply