डीजे व गुलालाला फाटा, सोमेश्वर मंडळाकडून महाराष्ट्रापुढे पुन्हा एकदा संस्कृतीचा आदर्श! मंडळाची गौरवशाली परंपरा; बाळासाहेब थोरातांच्या हस्ते आरती व पूजन, राज्यात भरपूर पाऊस पडू दे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची गणेश चरणी प्रार्थना
या पूजन सोहळ्यानंतर पारंपारिक लाठीकाठी, शिवकालीन मैदानी खेळ आणि विविध प्रात्यक्षिकांनी मिरवणुकीची शोभा वाढवली. पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि अलोट उत्साहात रंगलेल्या या सोहळ्यास संगमनेर शहरातील महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते







