Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

25/09/2026

मी पक्ष सोडलेला नाही माझ्या विजयाचं श्रेय कोणीही उकळू नये; स्वीडनच्या खासदार नीला विखेंच्या स्पष्टीकरणाने विखेंचं हसं

25/09/2026

प्रवराकाठी ‘एकविरा’चे ४५० शिलेदार; डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जन अन् निर्माल्य संकलन अभियान यशस्वी

25/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे
धार्मिक

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

महायुती सरकार खंबीरपणे बळीराजाच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

‘देवाच्या दरबारात आणि गणरायाच्या पुढे कोणीही मोठा किंवा छोटा नसतो, त्याच्या दृष्टीने सर्व सामान्य नागरिक समान असतात,’ असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. 

संगमनेर शहरातील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मानाच्या सोमेश्वर तरुण मित्र मंडळाच्या गणेशाची विसर्जन मिरवणूक शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता मोठ्या उत्साहात सुरू झाली. त्यावेळी आयोजित महाआरतीप्रसंगी ते बोलत होते.

रंगारगल्ली येथील सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणरायाची महाआरती आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. १३१ वर्षांची प्रदीर्घ परंपरा जपणाऱ्या या मंडळाच्या आरतीप्रसंगी प्रांताधिकारी अरुण उंडे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि गणेशभक्त उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार खताळ यांनी सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. खरीप हंगामातील पिके वाया गेल्याने शेतकरी अडचणीत आला असला, तरी महायुती सरकार खंबीरपणे बळीराजाच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

१९७२ चा दुष्काळ, मागील वर्षीचा ओला दुष्काळ आणि यंदाचा कोरडा दुष्काळ अशा संकटांमधून जनता मार्ग काढत असून, अल निनोचे संकट दूर होऊन राज्यात भरपूर पाऊस पडावा आणि सर्व नागरिक सुखी-समाधानी व्हावेत, असे साकडे त्यांनी विघ्नहर्त्याच्या चरणी घातले. तसेच राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मिळालेल्या संधीचे सोने प्रत्येकाने केले पाहिजे, असे सांगत त्यांनी देव, देश आणि धर्मासाठी नेहमी तत्पर राहण्याचा पुनरुच्चार केला. उत्सव काळात गणेशभक्तांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी सोमेश्वर मंडळाच्या वतीने खताळ दांपत्याचा इच्छापूर्ती गणेशाची प्रतिमा देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

आमदार दांपत्याने फिरवली लाठीकाठी- विसर्जन मिरवणुकीदरम्यान दांडपट्टा, लाठीकाठी आणि चक्री फिरवण्यासारख्या पारंपरिक मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. ही प्रात्यक्षिके पाहत असताना आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनाही या पारंपरिक खेळाचा मोह आवरला नाही. दोघांनीही उत्स्फूर्तपणे हातात काठी घेऊन ती गरगर फिरवत खेळाचा आनंद लुटला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 96
अमोल खताळ गणेश विसर्जन मिरवण गणेशोत्सव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रवराकाठी ‘एकविरा’चे ४५० शिलेदार; डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जन अन् निर्माल्य संकलन अभियान यशस्वी

25/09/2026

डीजे व गुलालाला फाटा, सोमेश्वर मंडळाकडून महाराष्ट्रापुढे पुन्हा एकदा संस्कृतीचा आदर्श! मंडळाची गौरवशाली परंपरा; बाळासाहेब थोरातांच्या हस्ते आरती व पूजन, राज्यात भरपूर पाऊस पडू दे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची गणेश चरणी प्रार्थना

25/09/2026

संगमनेर तालुक्यात १०२ कोटींच्या विकासकामांचा धडाका; उद्या पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

By Annant Ppangarkar25/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ‘देवाच्या दरबारात आणि गणरायाच्या पुढे कोणीही मोठा किंवा छोटा नसतो, त्याच्या…

मी पक्ष सोडलेला नाही माझ्या विजयाचं श्रेय कोणीही उकळू नये; स्वीडनच्या खासदार नीला विखेंच्या स्पष्टीकरणाने विखेंचं हसं

25/09/2026

प्रवराकाठी ‘एकविरा’चे ४५० शिलेदार; डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जन अन् निर्माल्य संकलन अभियान यशस्वी

25/09/2026

डीजे व गुलालाला फाटा, सोमेश्वर मंडळाकडून महाराष्ट्रापुढे पुन्हा एकदा संस्कृतीचा आदर्श! मंडळाची गौरवशाली परंपरा; बाळासाहेब थोरातांच्या हस्ते आरती व पूजन, राज्यात भरपूर पाऊस पडू दे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची गणेश चरणी प्रार्थना

25/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.