Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

ढोल-ताशांच्या गजरात आमदार अमोल खताळांनी वाढवला गणेशभक्तांचा उत्साह; सलग तिसऱ्या वर्षी संगमनेरात स्वागत कक्ष

26/09/2026

आज शनिवार २६ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

26/09/2026

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

25/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ढोल-ताशांच्या गजरात आमदार अमोल खताळांनी वाढवला गणेशभक्तांचा उत्साह; सलग तिसऱ्या वर्षी संगमनेरात स्वागत कक्ष
राजकारण

ढोल-ताशांच्या गजरात आमदार अमोल खताळांनी वाढवला गणेशभक्तांचा उत्साह; सलग तिसऱ्या वर्षी संगमनेरात स्वागत कक्ष

गणेश मंडळांच्या या सन्मानाची आणि स्वागताची सुंदर परंपरा पुढील काळातही अशीच अखंडपणे सुरू ठेवण्याचा संकल्प आमदार अमोल खताळ यांनी यावेळी व्यक्त केला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/09/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर संगमनेर शहरात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा भक्ती, जल्लोष आणि अनोख्या उत्साहाचा संगम पाहायला मिळाला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात संगमनेरकरांनी लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले ते आमदार अमोल खताळ यांनी स्वतः ढोल वाजवत गणेशभक्तांमध्ये भरलेला उत्साह!

गणेशोत्सवातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपली जावी, या उद्देशाने आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून सलग तिसऱ्या वर्षी विसर्जन मिरवणुकीतील मंडळांसाठी भव्य स्वागत कक्षाची उभारणी करण्यात आली होती. मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक लहान-मोठ्या गणेश मंडळाचे आमदार खताळ यांनी वैयक्तिकरीत्या स्वागत करून त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले. वर्षभर सामाजिक व धार्मिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर ही कौतुकाची थाप ठरली.

स्वागत कक्षाजवळ मिरवणूक आल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी स्वतः हातात काठी धरून ढोलवादनात सहभाग घेतला. त्यांच्या ढोलवादनामुळे उपस्थित तरुण व गणेशभक्तांमध्ये प्रचंड चैतन्य निर्माण झाले आणि संपूर्ण परिसर ढोल-ताशांच्या गजरत दुमदुमून गेला. गणेश मंडळांच्या या सन्मानाची आणि स्वागताची सुंदर परंपरा पुढील काळातही अशीच अखंडपणे सुरू ठेवण्याचा संकल्प आमदार अमोल खताळ यांनी यावेळी व्यक्त केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 88
अमोल खताळ गणेश विसर्जन ढोल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

25/09/2026

मी पक्ष सोडलेला नाही माझ्या विजयाचं श्रेय कोणीही उकळू नये; स्वीडनच्या खासदार नीला विखेंच्या स्पष्टीकरणाने विखेंचं हसं

25/09/2026

प्रवराकाठी ‘एकविरा’चे ४५० शिलेदार; डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जन अन् निर्माल्य संकलन अभियान यशस्वी

25/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

ढोल-ताशांच्या गजरात आमदार अमोल खताळांनी वाढवला गणेशभक्तांचा उत्साह; सलग तिसऱ्या वर्षी संगमनेरात स्वागत कक्ष

By Annant Ppangarkar26/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर संगमनेर शहरात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा…

आज शनिवार २६ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

26/09/2026

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

25/09/2026

मी पक्ष सोडलेला नाही माझ्या विजयाचं श्रेय कोणीही उकळू नये; स्वीडनच्या खासदार नीला विखेंच्या स्पष्टीकरणाने विखेंचं हसं

25/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.