Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दुष्काळाबाबतच्या सरकारच्या घोषणेचे स्वागत; मात्र शेतकऱ्यांना ठोस मदतीपासून वंचित ठेवू नका — किसान सभा

26/09/2026

ढोल-ताशांच्या गजरात आमदार अमोल खताळांनी वाढवला गणेशभक्तांचा उत्साह; सलग तिसऱ्या वर्षी संगमनेरात स्वागत कक्ष

26/09/2026

आज शनिवार २६ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

26/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुष्काळाबाबतच्या सरकारच्या घोषणेचे स्वागत; मात्र शेतकऱ्यांना ठोस मदतीपासून वंचित ठेवू नका — किसान सभा
राजकारण

दुष्काळाबाबतच्या सरकारच्या घोषणेचे स्वागत; मात्र शेतकऱ्यांना ठोस मदतीपासून वंचित ठेवू नका — किसान सभा

पीकविम्याची संरक्षित रक्कम हीच किमान भरपाईचा आधार मानून प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीनुसार अतिरिक्त भरपाईची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी, असे किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, डॉ. अजित नवले आणि उमेश देशमुख यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

राज्य सरकारने केंद्र सरकारच्या दुष्काळ संहितेनुसार पहिला टप्पा लागू करत २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केली आहे. या घोषणेचे अखिल भारतीय किसान सभेने स्वागत केले असले, तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या ठोस उपाययोजनांचा यात अभाव असल्याचे स्पष्ट केले आहे. सलग दोन खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यामुळे अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना केवळ कागदोपत्री आश्वासने न देता तातडीने भरपाई देण्याची आक्रमक मागणी किसान सभेने केली आहे.

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे आणि यंदा पावसाच्या अभावाने दुष्काळामुळे राज्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. उत्पादनात प्रचंड घट झाली असून शेतीचा खर्च, कर्जाचा बोजा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा गंभीर प्रश्न बळीराजासमोर उभा राहिला आहे. सरकार सध्या एनडीआरएफच्या जुन्या निकषांनुसार मदत देण्याचे सांगत आहे; मात्र कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टर मिळणारी ८,५०० रुपये, बागायतीसाठी १७,००० रुपये आणि फळपिकांसाठी २२,५०० रुपयांची ही मदत शेतीचा मूलभूत खर्चही भागवण्यासाठी अत्यंत तोकडी आहे.

या बिकट परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सरकारने २०२५ नंतर थकीत झालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना अवघ्या ५० हजारांची मदत देणे अन्यायाचे असून, त्यांना किमान २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी किंवा सवलत देण्यात यावी.

पीकविम्याची संरक्षित रक्कम हीच किमान भरपाईचा आधार मानून प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीनुसार अतिरिक्त भरपाईची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी, असे किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, डॉ. अजित नवले आणि उमेश देशमुख यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 98
किसान सभा दुष्काळ मदत मागणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ढोल-ताशांच्या गजरात आमदार अमोल खताळांनी वाढवला गणेशभक्तांचा उत्साह; सलग तिसऱ्या वर्षी संगमनेरात स्वागत कक्ष

26/09/2026

मी पक्ष सोडलेला नाही माझ्या विजयाचं श्रेय कोणीही उकळू नये; स्वीडनच्या खासदार नीला विखेंच्या स्पष्टीकरणाने विखेंचं हसं

25/09/2026

दुष्काळसदृश परिस्थितीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

दुष्काळाबाबतच्या सरकारच्या घोषणेचे स्वागत; मात्र शेतकऱ्यांना ठोस मदतीपासून वंचित ठेवू नका — किसान सभा

By Annant Ppangarkar26/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्य सरकारने केंद्र सरकारच्या दुष्काळ संहितेनुसार पहिला टप्पा लागू करत २६५…

ढोल-ताशांच्या गजरात आमदार अमोल खताळांनी वाढवला गणेशभक्तांचा उत्साह; सलग तिसऱ्या वर्षी संगमनेरात स्वागत कक्ष

26/09/2026

आज शनिवार २६ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

26/09/2026

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

25/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.