Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरसकट कर्जमाफीची आग्रही मागणी

26/09/2026

संगमनेरचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश; आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

26/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश; आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश
राजकारण

संगमनेरचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश; आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, शेती कर्जाच्या वसुलीला स्थगिती किंवा कर्जाची पुनर्रचना, वीज बिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा यांसारख्या विविध सवलतींचा लाभ मिळणार आहे. असे आमदार खताळ यांनी सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/09/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
चालू वर्षी पावसात पडलेल्या मोठ्या खंडामुळे संगमनेर तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या बिकट परिस्थितीची दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. त्यांच्या या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, राज्य शासनाने जाहीर केलेल्या २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत संगमनेरचाही समावेश करण्यात आला आहे.
आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पावसाअभावी खरीप पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकतेच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पिंपळे येथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली होती.
संगमनेरचा दुष्काळग्रस्त भागात समावेश झाल्यामुळे आता तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे केले जाणार असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट पंचनामे करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, शेती कर्जाच्या वसुलीला स्थगिती किंवा कर्जाची पुनर्रचना, वीज बिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा यांसारख्या विविध सवलतींचा लाभ मिळणार आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात असला तरी महायुती सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत, आगामी काळातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही आमदार खताळ यांनी दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 91
अमोल खताळ दुष्काळ राजकारण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरसकट कर्जमाफीची आग्रही मागणी

26/09/2026

दुष्काळाबाबतच्या सरकारच्या घोषणेचे स्वागत; मात्र शेतकऱ्यांना ठोस मदतीपासून वंचित ठेवू नका — किसान सभा

26/09/2026

ढोल-ताशांच्या गजरात आमदार अमोल खताळांनी वाढवला गणेशभक्तांचा उत्साह; सलग तिसऱ्या वर्षी संगमनेरात स्वागत कक्ष

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरसकट कर्जमाफीची आग्रही मागणी

By Annant Ppangarkar26/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात झालेला अत्यंत अल्प पाऊस आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिना…

संगमनेरचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश; आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

26/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026

दुष्काळाबाबतच्या सरकारच्या घोषणेचे स्वागत; मात्र शेतकऱ्यांना ठोस मदतीपासून वंचित ठेवू नका — किसान सभा

26/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.