Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरसकट कर्जमाफीची आग्रही मागणी

26/09/2026

संगमनेरचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश; आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

26/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरसकट कर्जमाफीची आग्रही मागणी
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरसकट कर्जमाफीची आग्रही मागणी

सरकारने जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा पूर्णपणे कोरा करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:

अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात झालेला अत्यंत अल्प पाऊस आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिना पूर्णपणे कोरडा गेल्याने हाता-तोंडाशी आलेली खरिपाची पिके वाया गेली आहेत. या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, ही काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेली मागणी अखेर मान्य झाली आहे. सरकारने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्याने बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात राज्यभरात सर्वत्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी कमालीचा हवालदिल झाला होता. संगमनेर तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांमधून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. केवळ कागदी पंचनाम्यांचा फार्स न करता शेतकऱ्यांना थेट मदत मिळावी, यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. याच मुद्द्यावर संगमनेरमध्ये हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढून सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते. या मोर्चातून शेतमजुरांना रोजंदारी, दुष्काळी कामांची सुरुवात, पाण्याचे नियोजन, पूर्ण दाबाने वीजपुरवठा आणि संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे, अशा विविध मागण्या लावून धरण्यात आल्या होत्या.

महाविकास आघाडी आणि काँग्रेस सरकारच्या काळात शेतकरी अडचणीत असताना सरकारने नेहमीच खंबीर साथ दिल्याचा उल्लेख करत, बाळासाहेब थोरात यांनी या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जागे होण्याचा इशारा दिला होता. याच काळात गणेशोत्सवाच्या धामधुमीत दुष्काळाची भीषणता ओळखून ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनीही हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी करत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांत्वन केले होते. या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आणि मंत्र्यांच्या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यांनंतर सरकारने दुष्काळाची दखल घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना अंशतः दिलासा मिळाला असला तरी लढा अजून संपलेला नाही, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा पूर्णपणे कोरा करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. याशिवाय शेतमजुरांना रोजंदारी देणे आणि कोणत्याही कागदोपत्री क्लिष्टतेशिवाय सर्व दुष्काळी योजनांचा लाभ तातडीने थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 88
कर्जमाफी दुष्काळ बाळासाहेब थोरात मागणी राजकारण शेतकरी कर्जमाफी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश; आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

26/09/2026

दुष्काळाबाबतच्या सरकारच्या घोषणेचे स्वागत; मात्र शेतकऱ्यांना ठोस मदतीपासून वंचित ठेवू नका — किसान सभा

26/09/2026

ढोल-ताशांच्या गजरात आमदार अमोल खताळांनी वाढवला गणेशभक्तांचा उत्साह; सलग तिसऱ्या वर्षी संगमनेरात स्वागत कक्ष

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरसकट कर्जमाफीची आग्रही मागणी

By Annant Ppangarkar26/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात झालेला अत्यंत अल्प पाऊस आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिना…

संगमनेरचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश; आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

26/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026

दुष्काळाबाबतच्या सरकारच्या घोषणेचे स्वागत; मात्र शेतकऱ्यांना ठोस मदतीपासून वंचित ठेवू नका — किसान सभा

26/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.