Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ
धार्मिक

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

या सोहळ्यास स्वामी नरेंद्राचार्य महाराज भक्त मंडळाचे पदाधिकारी, महायुतीचे नेते, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/10/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

बदलते हवामान, वाढते तापमान आणि राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यावर मात करण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी केवळ शासनच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे जोपासना व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.

जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज (नाणीजधाम) यांच्या नाशिक रामशेज उपपीठातून निघालेल्या ‘वसुंधरा पायी दिंडी सोहळ्याचे संगमनेर-सिन्नर सरहद्दीवरील कर्हे घाट येथे अहिल्यानगर जिल्हा भक्त मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

घुलेवाडी येथील मुक्कामानंतर ही दिंडी आळेफाट्याकडे मार्गस्थ होत असताना चंदनापुरी येथील सिद्धू लॉन्स येथे दर्शन व महाप्रसादासाठी थांबली होती. याप्रसंगी आमदार अमोल खताळ पाटील यांनी स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

वसुंधरा पायी दिंडीच्या माध्यमातून गावागावात पर्यावरण संवर्धनाचा अत्यंत स्तुत्य संदेश पोहोचवला जात असून, यामुळे नागरिकांमध्ये वृक्षलागवडीबाबत मोठी जनजागृती होत असल्याचे मत यावेळी आमदार खताळ यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान भक्त मंडळाच्या वतीने आमदार खताळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास स्वामी नरेंद्राचार्य महाराज भक्त मंडळाचे पदाधिकारी, महायुतीचे नेते, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 130
अमोल खताळ दिंडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ शेतकऱ्यांच्या बांधावर; पिकांसंदर्भात अधिकाऱ्यांना या सूचना

01/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- बदलते हवामान, वाढते तापमान आणि राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यावर…

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.