Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार
गुन्हेगारी

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

नगर-मनमाड रस्त्याने भिवंडीकडे बेकायदेशीर गुटखा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
अहिल्यानगर येथून नगर-मनमाड रस्त्याने भिवंडी येथे बेकायदेशीरपणे विक्रीसाठी नेण्यात येणारा सुगंधीत सुपारी, तंबाखू व गुटख्याचा साठा स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने हस्तगत केला आहे. नांदगाव शिवारातील इसार पेट्रोलपंपासमोर करण्यात आलेल्या या धडक कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह तब्बल १२ लाख ८१ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह चार जण फरार झाले आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, संतोष खैरे, अभिजीत अरकल, रणजीत जाधव व भगवान धुळे यांचे पथक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी दोन इसम बोलेरो पिकअप (क्र. MH-04-MR-2329) मधून नगर-मनमाड रस्त्याने भिवंडीकडे बेकायदेशीर गुटखा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप परशुराम पवार यांना सोबत घेऊन नगर-मनमाड रस्त्यावरील नांदगाव (ता. अहिल्यानगर) येथील हॉटेल खालसा पंजाब शेजारी सापळा रचला. संशयित वाहन येताच पंचांसमक्ष अडवून पाहणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात बंदी असलेला सुगंधीत पानमसाला, सुपारी आणि तंबाखूचा साठा आढळून आला.
या कारवाईत कैफ अहमद अल्ताफ शेख (वय ४५, रा. शांतीनगर, भिवंडी, जि. ठाणे) आणि वाजीद उर्फ गोल्डी शब्बीर शेख (वय २९, रा. बुऱ्हाणपूर, लोहारमंडी, लालबाग, मध्य प्रदेश) या दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ६ लाख ६०० रुपयांची सुगंधीत सुपारी, ९२ हजार ४०० रुपयांची टोबॅको, ६१ हजार ३६० रुपयांचा रजनीगंधा पानमसाला, २६ हजार ७७५ रुपयांची तुलसी सुगंधीत तंबाखू आणि ५ लाख रुपये किमतीची बोलेरो मॅक्स पिकअप गाडी असा एकूण १२,८१,१३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक केलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, हा माल राजू कुरेशी उर्फ मोहम्मद मुस्लिम मोहंमद्दीर अन्सारी (रा. भिवंडी), इम्रान उर्फ मोहम्मद इकबाल कुरेशी (रा. गुलजारनगर, भिवंडी), भूपेंद्र बापू सिंह (रा. पोलो ग्राऊंड, इंदौर, मध्य प्रदेश) आणि अक्षय गुप्ता (रा. इंदौर, मध्य प्रदेश) यांच्या सांगण्यावरून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. फरार असलेल्या या चारही आरोपींचा पोलीस शोध घेत असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 142
अन्न व औषध प्रशासन अहिल्यानगर एलसीबी एफडीए गुटखा गुटखा कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

अवैध गावठी कट्टा बाळगणाऱ्या ‘या’ तरुणाला पोलिसांनी पकडले; ५० हजारांचे अग्निशस्त्र जप्त

02/10/2026

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

30/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर येथून नगर-मनमाड रस्त्याने भिवंडी येथे बेकायदेशीरपणे विक्रीसाठी नेण्यात येणारा सुगंधीत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.