Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ
दुर्दैवी

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

या घटनेमुळे संगमनेरमध्ये जमिनीच्या व्यवहारात मध्यस्थी करणारे दलाल, खरेदी-विक्रीतील पारदर्शकता आणि नागरिकांची फसवणूक रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/10/2026Updated:06/10/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेर शहरातील कुरण रोड परिसरातील ५० वर्षीय राम अवतार या बेकरी चालकाने जमिनीच्या व्यवहारातून झालेल्या कथित फसवणुकीला कंटाळून रायतेवाडी परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम अवतार हे कुरण रोड परिसरात बेकरी व्यवसाय चालवत होते. जमिनीच्या व्यवहारातून आपली फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी काही व्हिडिओ तयार केल्याची माहिती समोर आली असून, या व्हिडिओमध्ये त्यांनी संबंधित जमिनीच्या व्यवहारातील काही व्यक्तींची नावे घेतल्याचे सांगितले जात आहे.

राम अवतार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांसह संगमनेर शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा ठावठिकाणा मिळू शकला नाही. अखेर सकाळच्या सुमारास शहरालगतच्या परिसरात एका झाडाला त्यांचा मृतदेह आढळून आला.

या घटनेनंतर जमिनीच्या व्यवहारातील फसवणुकीचा आरोप, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि राम अवतार यांनी आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओमधील दावे याबाबत आता पोलिस तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

या घटनेमुळे संगमनेरमध्ये जमिनीच्या व्यवहारात मध्यस्थी करणारे दलाल, खरेदी-विक्रीतील पारदर्शकता आणि नागरिकांची फसवणूक रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 519
आत्महत्या फसवणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

16/07/2026

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल

14/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

By Annant Ppangarkar06/10/20260

संगमनेर | प्रतिनिधी सोमवारी (५ ऑक्टोबर) दिल्ली नाका परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने गतिरोधक…

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.