Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….
न्यायालय

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले. या खटल्यात पैरवी कॉन्स्टेबल म्हणून स्वाती नाईकवाडी यांनी सहकार्य केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संगमनेर येथील सत्र न्यायालयाने आरोपी रुपेश उर्फ अनिल बुधा सोनवणे (रा. मुरशेत, ता. अकोले) याला दोषी ठरवत ३ वर्षांच्या सक्तमजुरीची व दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणाती दुसरा आरोपी पंढरी प्रभाकर पगारे (रा. आधारवाडी, ता. इगतपुरी) यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, ६ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी आरोपी रुपेश सोनवणे याने पीडित मुलीला झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने मोटरसायकलवर बसवून शिंगणवाडी शिवारातील जंगलात नेले. तेथे तिच्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर पीडितेने राजूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर ३४८/२०२३ नुसार भारतीय दंड संहिता कलम २१२, ३५४, ३६६ आणि बाल लैंगिक अत्याचार कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात सहा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. यातून महत्वपूर्ण माहिती न्यायालयासमोर आली. न्यायालयाने साक्षी-पुरावे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी रुपेश उर्फ अनिल बुधा सोनवणे याला पोक्सो कायदा कलम ८ अंतर्गत ३ वर्षांचा सक्तमजुरीचा कारावास आणि २००० रुपये दंड सुनावला. दंड न भरल्यास १५ दिवसांच्या अतिरिक्त कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय भारतीय दंड संहिता कलम ३५४ अंतर्गत २ वर्षे सक्तमजुरी व २००० रुपये दंड, तसेच कलम ३६६ अंतर्गत २ वर्षे सक्तमजुरी व १००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच पीडितेला ५००० रुपयांची आर्थिक भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणात पोलीस तपासात तपासी अंमलदार म्हणून पी.एस.आय. फझल शेख यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले. या खटल्यात पैरवी कॉन्स्टेबल म्हणून स्वाती नाईकवाडी यांनी सहकार्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 344
अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय शिक्षा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

07/10/2026

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संगमनेर येथील…

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.