Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर
न्यायालय

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

संगमनेर परिसर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील संपूर्ण गांजा रॅकेट उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे पुढील तपास करीत आहे. पोलीस याप्रकरणी कितपत तपास करतात हे लवकरच समोर येईल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

शहरालगत सुमारे दीडशे किलो गांजा प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, संगमनेर न्यायालयाने आरोपींना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या कोठडीत दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सायखिंडी फाटा येथे अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत ७६ लाख ३० हजार ५०० रुपये किमतीचा १५२.६१ किलो वाळलेला सुट्टा गांजा आणि वाहनासह तब्बल ८८ लाख १८ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालणकर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम (NDPS Act) च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दत्तात्रय नानाभाऊ इचके (वय ३३, रा. कवठे यमाई, ता. शिरुर), श्रीहरी बाळू मिडगुले (वय ३५, रा. कान्हुर यमाई, ता. शिरुर) आणि साहेबराव उर्फ भाऊसाहेब बाबुराव मिडगुले (वय ५९, रा. कान्हुर यमाई, ता. शिरुर) यांना अटक करण्यात आली आहे.

तपासात या गांजा तस्करांचे धागेदोरे थेट ओडिशा राज्याशी आणि आंतरराज्य टोळीशी जोडले गेल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी हा मुद्देमाल उडीसा येथून आणल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपींच्या ताब्यातून नेक्सॉन कार, विविध बँकांची ५ एटीएम कार्ड्स, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात संगमनेर, पुणे आणि इतर ठिकाणच्या अनेक फरार आरोपींचा शोध घेणे बाकी असल्याचे न्यायालयासमोर सांगण्यात आले.

न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सहाय्यक सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी न्यायालयात सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला. आरोपींनी गांजा विक्रीतून केलेले ऑनलाईन व बँकेतील आर्थिक व्यवहार तपासणे, आरोपींचे बँक स्टेटमेंट काढून चौकशी करणे तसेच इतर फरार साथीदारांचा शोध घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी आरोपींना १२ तारखेपर्यंत पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आरोपींच्या बँक खात्यांमधील आर्थिक व्यवहारांची बारकाईने माहिती मिळवून संगमनेर परिसर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील संपूर्ण गांजा रॅकेट उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे पुढील तपास करीत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 120
अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय पोलीस कोठडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

07/10/2026

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शहरालगत सुमारे दीडशे किलो गांजा प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईत अटक करण्यात…

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.