Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी
राजकारण

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

मंत्रालयात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन सादर केले निवदेन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/10/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित गंभीर समस्या तातडीने सोडवण्यासाठी आमदार अमोल खताळ पाटील यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. त्यांनी मंत्रालयात ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन मतदारसंघातील वीज यंत्रणेच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. या भेटीदरम्यान त्यांनी संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथील मंजूर वीज उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करण्याची आग्रही मागणी निवेदनाद्वारे केली.

तालुक्यातील अनेक गावे आणि वाड्या-वस्त्यांमध्ये वीजपुरवठा सातत्याने विस्कळीत होत असून, त्यामुळे शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतीच्या कृषी पंपांचा वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नादुरुस्त होणारे ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) आणि नवीन रोहित्र उपलब्ध न होणे या अडथळ्यांमुळे शेतीच्या कामांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे. ही बाब आमदार खताळ यांनी राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

ग्रामीण भागातील महावितरणची यंत्रणा अधिक सक्षम करून वारंवार नादुरुस्त होणारे रोहित्र बदलून नवीन बसवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच मेंढवन येथील प्रस्तावित वीज उपकेंद्र लवकरात लवकर सुरू झाल्यास परिसरातील अनेक गावांचा वीज प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होईल, यावर आमदार खताळ यांनी भर दिला.

शेतकऱ्यांना विजेअभावी अडचणींना सामोरे जावे लागू नये आणि सर्वसामान्य नागरिकांना नियमित वीजपुरवठा मिळावा, यासाठी संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 92
अमोल खताळ ऊर्जा राज्यमंत्री निवेदन मेघना बोर्डीकर वीज समस्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित गंभीर समस्या तातडीने सोडवण्यासाठी आमदार अमोल खताळ पाटील…

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.