Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार, १२ ऑक्टोंबर जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर
न्यायालय

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

या प्रकरणात आरोपी रामदास गोपाळघरे यांच्या वतीने अ‍ॅड. वैभव सुरेश डोंगरे यांनी न्यायालयात बाजू मांडली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपी रामदास भानुदास गोपाळघरे याला न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. श्रीगोंदे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांनी गुरुवारी या जामीन अर्जावर निर्णय दिला.

अहिल्यानगरचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रदिप परशुराम पवार यांनी २९ सप्टेंबर २०२६ रोजी जामखेड तालुक्यातील नागोबाची वाडी येथे विनापरवाना ५,२७,५६० रुपये किमतीची स्किम्ड मिल्क पावडर साठवल्याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार खर्डा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात आरोपी रामदास गोपाळघरे यांच्या वतीने अ‍ॅड. वैभव सुरेश डोंगरे यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, अर्जदाराकडे दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायाचा वैध परवाना आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल्यानुसार त्यांनी सदर गुन्हा दाखल करताना पोलिस यंत्रणेकडून एफ आय आर दाखल करताना झालेल्या चुका न्यायालयासमोर मांडल्या. याशिवाय, जप्त केलेला पदार्थ कोणाला विषबाधा करण्यासाठी वापरला जाणार होता याचे पुरावे नसल्याने भारतीय न्याय संहितेचे कलम १२३ या प्रकरणात लागू होत नाही, असा युक्तिवादही अ‍ॅड. डोंगरे यांनी न्यायालयात केला.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोठडीत चौकशीची गरज नसल्याचे नमूद करत ५०,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर रामदास गोपाळघरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. तसेच तपासात पोलिसांना सहकार्य करण्याचे आणि पुराव्यांशी छेडछाड न करण्याचे निर्देश न्यायालयाने आरोपीला दिले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 240
जामीन दूध दूध भेसळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार, १२ ऑक्टोंबर जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar12/10/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी उत्साही आणि लाभदायक राहील. कुटुंबाची साथ लाभेल आणि…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.