Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, बुधवार १५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 15, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लेखापरीक्षकाला एक वर्षाची कैदेची शिक्षा
न्यायालय

लेखापरीक्षकाला एक वर्षाची कैदेची शिक्षा

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 26, 2022Updated:September 26, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

शेअर मार्केट मधील व्यवहारात तोटा आल्याने त्याची जबाबदारी स्वीकारत मुंबईतील मुलुंडमध्ये राहणाऱ्या लेखापरीक्षकाने दिलेला धनादेश न वटल्याने संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी लेखा परीक्षक असलेल्या आरोपीस एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय फिर्यादीस 16 लाख 12 हजार 500 रुपये देण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले.

संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील सविता कानवडे यांनी आपल्या ओळखीच्या असलेल्या मुंबई येथील राजेश मुलजीभाई रूपारेल या लेखापरीक्षकाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. संबंधित महिलेचे ट्रेडिंग अकाउंट आरोपी राजेश रूपारेल यांनी हाताळले होते. शेअर मार्केटच्या या व्यवहारात कानवडे यांना तोटा सोसावा लागला. त्यामुळे रूपारेल यांनी कायदेशीर रक्कम देण्याची जबाबदारी स्वीकारत फिर्यादी महिलेस आयसीआयसीआय या बँकेचा मुलुंड शाखेचा 12 लाख 90 हजार रुपयांचा धनादेश दिला होता.

कानवडे यांनी हा धनादेश त्यांच्या खात्यामध्ये भरला असता आरोपी राजेश रूपारेल यांच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो परत आला होता. त्यामुळे कानवडे यांनी आरोपी विरोधात चलनक्षम कायदा कलम 138 अन्वये संगमनेरच्या न्यायालयात 2017 मध्ये तक्रार केली होती. संगमनेर न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. यु. महादर यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी सुरू होती.

फिर्यादी कानवडे यांच्या वतीने संगमनेरमधील वकील गिरीश मेंद्रे यांनी न्यायालयासमोर फिर्यादीची बाजू मांडली. त्यांना वकील एम. एस. जोर्वेकर यांनी सहकार्य केले. न्यायाधीश एस. यु. महादर यांनी फिर्यादी आणि आरोपी यांच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर समोर आलेल्या पुराव्याअंती लेखापरीक्षक असलेल्या आरोपी राजेश रूपारेल यांना दोषी ठरवत एक वर्ष साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. शिवाय फिर्यादी महिलेस न वठलेल्या धनादेशाचे नुकसान भरपाई म्हणून 16 लाख 12 हजार 500 रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 248
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर पोलिसांचा धक्कादायक कारनामा; १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला २० वर्षांचा दाखवून तब्बल पाच महिने डांबले जेलमध्ये; न्यायालयानं बजावली नोटीस, तपासी अधिकारी अडचणीत!

July 1, 2026

३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत फाशी; महाराष्ट्रातील सर्वात जलद गतीने लागलेला ऐतिहासिक निकाल!

June 29, 2026

संगमनेरमधील फसवणूक प्रकरणातील आरोपी भाऊसाहेब कुटे यांना औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर; प्रकृती आणि ७५ लाखांची ठेव लक्षात घेऊन कोर्टाचा निर्णय

June 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, बुधवार १५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

आजचे राशिभविष्य मेष – आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. गजकेसरी…

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.