Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

आज, बुधवार १५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 15, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संतोष बांगरांपाठोपाठ गुलाबराव पाटीलांविरोधात शिवसैनिक आक्रमक
आंदोलन

संतोष बांगरांपाठोपाठ गुलाबराव पाटीलांविरोधात शिवसैनिक आक्रमक

पाणी पुरवठा मंत्र्यांचा ताफा अडविण्याचा धुळ्यात प्रयत्न ‘५० खोके, गद्दार ओके’ म्हणत जोरदार घोषणाबाजी
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 30, 2022No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

चाळीस आमदारांनी शिवसेनेतून फुटत भाजपाशी हातमिळवणी करीत सरकार स्थापन केले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांना, शिवसेनेच्या आमदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, याची प्रचिती पून्हा आली. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात येणाऱ्या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची गाडी शिवसैनिकांनी अडविण्याचा प्रयत्न करीत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा शिवसैनिकांनी गुलाबराव पाटील यांना टार्गेट केले. यावेळी ‘पन्नास खोके गद्दार ओके’ अशी घोषणाबाजीही करण्यात आली. मंत्री झाल्यानंतर पाटील प्रथमत:च धुळे दौऱ्यावर आले होते. शिंदे गटाच्यावतीने मुंबईत बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या निमीत्ताने सायंकाळी धुळ्यात सैनिक लॉन्सवर कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पाटील अंमळनेरमार्गे धुळ्याकडे येत असतांना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान पारोळा चौफुल्यावर हा प्रकार घडला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील आदींनी ‘पन्नास खोके, एकदम ओके’ची जोरदार नारेबाजी केली. मंत्री पाटील यांच्या दौऱ्यावेळी अचानकपणे झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणाही काही काळ गोंधळून गेली होती.

अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी जात शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांत काही वेळ बाचाबाचीचाही प्रकार घडला.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 211
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरकरांच्या हक्काची रेल्वे शिर्डीकडे पळवली; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप, संगमनेरकरांनी आता रस्त्यावर उतरावे!

June 30, 2026

राजकीय गद्दारीच्या विरोधात माकप राज्यभर तीव्र निदर्शने करणार: डॉ. अजित नवले

June 21, 2026

संगमनेर येथे शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक; खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

June 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : सध्या खरीप हंगामाने वेग घेतला असून तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजरी,…

आज, बुधवार १५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 15, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.