महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्रगण्य असणाऱ्या व सुमारे ५० देशांमध्ये तीन लाखाहून अधिक कर्मचारी असलेल्या कॅपजेमिनी या कंपनीत अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील १११ विद्यार्थ्यांची चांगल्या पगारावर थेट निवड झाली. अशी माहिती प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली.
डॉ. व्यंकटेश म्हणाले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज हे राज्यातील अग्रमानांकित महाविद्यालय ठरले आहे. नॅकचा ‘ए प्लस’ दर्जा मिळवणाऱ्या या महाविद्यालयामध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या थेट मुलाखती आयोजित करत असतात.
कॅपजेमिनी या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपनीने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या सुरुवातीला अमृतवाहिनीतील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन यामधून १११ विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
मागील वर्षीही कॅपजेमिनी या कंपनीत या महाविद्यालयातील ९३ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मागील वर्षी १६८३ विद्यार्थ्यांना चांगल्या पगारावर थेट नोकऱ्या मिळाल्या आहेत. गुणवत्तेबरोबरच अमृतवाहिनीचे विद्यार्थी हे विविध क्षेत्रातही नेहमी झळकत असून नुकतेच ३८ विद्यार्थ्यांची एमपीएससीमधून निवड झाली आहे. ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रा. बाळासाहेब साबळे हे सातत्याने विविध कंपन्यांशी संपर्कात राहून कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करत असतात.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयूताई देशमुख, इंद्रजीत थोरात, बाजीराव खेमनर, आर. बी. सोनवणे, लक्ष्मणराव कुटे, विलास वर्पे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. धुमाळ यांनी अभिनंदन केले आहे.
प्रति वर्ष ४.२५ लाख, ७.२० लाख, आणि ५.७५ लाख रुपयांच्या या पॅकेजवर तीन टप्प्यात विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांची भाषिक चाचणी, तांत्रिक चाचणी, टेस्ट, इंग्लिश संप्रेषण, कोडींग फेरी व तांत्रिक आणि वैयक्तिक मुलाखतींमधून ही निवड केली आहे.


