महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत न्यायालयाने 10 ऑक्टोबर पर्यंत वाढ केल्याने राऊत यांना दसराही तुरुंगातच घालवावा लागणार आहे. त्यामुळे उद्याचा शिवसेनेचा दसरा मेळावा त्यांच्या गैरहजेरीत होणार आहे.
खासदार राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होऊन त्यांची सुटका होईल असा अंदाज होता मात्र न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 10 ऑक्टोंबर पर्यंत पुन्हा वाढ केली आहे. तोपर्यंत राऊत यांना तुरुंगातच राहावे लागेल. 10 ऑक्टोंबरलाच त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात व्यासपीठावर राऊत यांच्या नावाची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. मात्र यावेळी न्यायालयात त्यांना जामीन अर्ज मंजूर होऊन दसरा मेळाव्यासाठी त्यांची उपस्थिती असेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र न्यायालयाने राऊत यांच्या कोठडीत वाढ केल्याने हा अंदाज फोल ठरला. त्यामुळे बुधवारी शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात संजय राऊत उपस्थित नसतील.
गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन
गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजाणी
संचालनालयाने ( ईडी) ३१ जुलै रोजी
संजय राऊत यांना अटक केली होती.
संजय राऊत यांनी जामीन मिळावा
यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
त्यावर २७ सप्टेंबरला सुनावणी पार पडली होते मात्र त्यावेळी राउत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला होता.



