Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिक्षणातून समाजाची प्रगती : प्रा. बाविस्कर
शिक्षण

शिक्षणातून समाजाची प्रगती : प्रा. बाविस्कर

भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात ‘भुरा’ कादंबरीवर परिसंवाद
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/10/2022Updated:04/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शिक्षणातून खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होते. बोलीभाषा ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्याला बोलीभाषा चांगली येते तोच इतर भाषांवर प्रभुत्व गाजवू शकतो. सर्व शिक्षण हे बोलीभाषेतून मिळाल्याने ते ज्ञान वाढीस अधिक पूरक ठरते. असे प्रतिपादन दिल्लीच्या जेएनयु विद्यापीठाचे प्रा. शरद बाविस्कर यांनी केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात ‘भुरा एक शैक्षणिक आत्मचिंतन’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे होत्या. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे, सहसचिव दत्तात्रय चासकर, रजिस्टर बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य शिवाजीराव नवले, डॉ. बाळासाहेब वाघ, समन्वयक प्रा. लक्ष्मण घायवट, प्रा. तुळशीराम जाधव, प्रा. हेमलता राठोड आदी उपस्थित होते. प्रा. बाविस्कर यांच्या ‘भुरा’ या आत्मचिंतनपर परिसंवादात डॉ. दीनानाथ पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात परिसंवाद घेतला.

बाविस्कर म्हणाले, मी ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन मोठे झालो. बोलीभाषेला कायम प्राधान्य दिले. शिक्षण हे कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन करून त्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वाचे असते. बौद्धिक क्षमतेचा विकास मातृभाषेमुळेच होतो. पूर्वी धार्मिकतेसाठी शिक्षण घेतले जायचे मात्र आता प्रत्येकाला बौद्धिक विकास व व्यक्त होण्यासाठी शिक्षण अत्यंत गरजेचे आहे.

शिक्षणामुळे प्रश्न निर्माण होतात. प्रश्नांतून बौद्धिक चिकित्सा वाढते. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असून तो का व कसा आहे हे प्रत्येकाला कळाले पाहिजे. सध्या नागरिक नव्हे तर भक्त घडवण्यासाठी शिक्षणाकडे काही लोक पाहत आहेत. साहित्य, संस्कृती, शिक्षणाचे लोकशाहीकरण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. स्वाती ठोंबरे यांनी तर प्रा. शिवाजी नवले यांनी आभार मानले. यावेळी शहरातील वाचनप्रेमी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जीवनात संघर्ष अपरिहार्य असतो. त्या संघर्षातून उभे राहण्यासाठी शिक्षण चांगले साधन आहे. प्रत्येकाने शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला शिकले पाहिजेत.

रंगनाथ पठारे, साहित्यिक.

वाचनामुळे जीवनाला समृद्धी प्राप्त होते. सर्वांनी वाचनावर भर दिला पाहिजे. संगमनेरमध्ये वाचन चळवळ मोठी असून या शहराला एक साहित्यिक परंपरा लाभली आहे.

दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 154
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.