Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

आज, बुधवार १५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 15, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक दुर्घटना । मृताच्या कुटूंबियांना केंद्र व राज्य सरकारकडून ७ लाखाची मदत
महाराष्ट्र संवाद विशेष

नाशिक दुर्घटना । मृताच्या कुटूंबियांना केंद्र व राज्य सरकारकडून ७ लाखाची मदत

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह, मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली दखल
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 8, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मृतांचा आकडा १२ वर तर जखमींची संख्या ३८

बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचे निष्पन्न

चोवीस तासाच्या आत बस पेटण्याची दुसरी घटना

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

शनिवार नाशिककरांसाठी अपघातवार ठरला. बस पेटण्याच्या दोन घटना नाशिक शहर व जिल्ह्यात घडल्या. एका घटनेत मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली तर दुसऱ्या घटना मात्र सुदैवाने सर्व प्रवाशांचे प्राण वाचले आहे. नाशिकमध्ये नांदूरफाटा येथील घटनेत मृतांच्या संख्येत वाढ होवून ही संख्या १२ वर गेली तर ३८ प्रवासी जखमी असल्याचे समोर आले आहे. मृतकांच्या वारसांना पंतप्रधान निधीतून प्रत्येकी दोन लाख तर राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असून केंद्र सरकारकडूनही पंतप्रधानी ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.पहाटे नांदूर फाटा येथील दुर्घटनेचे वृत्त समोर येत नाही तोच जिल्ह्यातील वणी गडावर जात असतांना प्रवासी बसला अचानक आग लागली. अचानकपणे घडलेल्या या प्रकारानंतर प्रवाश्यांनी सतर्कता दाखविल्याने सर्वांचे प्राण वाचले. या घटनेत जिवीतहानी झाली नाही. दोन्ही घटनांमध्ये बसचे नुकसान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील या अपघाताप्रकरणी सहवेदना व्यक्त करत पंतप्रधान निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाखाची व जखमींना पन्नास हजाराची मदत जाहीर केली.दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने विमानाने नाशिकमध्ये आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी डी. गंगाधरन, आयुक्तांशी चर्चा केली. शोक व्यक्त करत त्यांनी चौकशीचे आदेश दिले. मृतकांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सुचना देण्यात आले. जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे.यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनीदेखील यवतमाळ येथील चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात जात माहिती घेतली. बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनीदेखील यासंदर्भात चौकशीचे आदेश देत जिल्हाधिकाऱ्यांकडून फोनवरुन माहिती घेत घटनेमागील कारणांचा शोध घेण्याचे निर्देश दिले.

नाशिकचे पालमंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रीया सुळे, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री छगन भुजबळ आदींनीदेखील यासंदर्भात दु:ख व्यक्त केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 123
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

भाकरीच्या भुकेने आणि जगण्याच्या वेदनेतून निर्माण झालेले नारायण सुर्वे यांचे साहित्य माणसाला जगण्याची ताकद देते : ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे

July 14, 2026

दोन फुटांवर मृत्यूचा थरार! आश्वी खुर्द येथे क्षिरसागर दाम्पत्य थोडक्यात बचावले; दोन विभागांच्या ढकलाढकलीत नागरिकांचा जीव टांगणीला

July 8, 2026

चंदनापुरी घाटात दरड कोसळली; नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

July 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : सध्या खरीप हंगामाने वेग घेतला असून तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजरी,…

आज, बुधवार १५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 15, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.